शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सराईत घरफोड्यांना पाठलाग करून पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 12:55 IST

ओझर: येथील पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून पकडण्यात यश मिळविले.

ओझर: येथील पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून पकडण्यात यश मिळविले. मध्यरात्रीच्या थराराने नागरिकांमध्येही भितीचे वातावरण होते.सोमवारी रात्रीच्या सुमारास गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी खाजगी वाहनातुन गस्त करीत असतांना टिळकनगर भागात रात्री १.३० वाजेच्या सुमारास एका बंगल्यात दोन ईसम संशयितरीत्या आत जातांना दिसले. गुन्हे शोधपथकाला बाहेर थांबून थोडी वाट पाहिली व नंतर त्यांच्याविषयी संशय बळावल्याने त्यांनी बंगल्यात आत प्रवेश करु न पाहिले असता दरवाजाचे कुलुप तोडलेले आढळले. म्हणून सदरचे संशयित ईसम हे चोरटे असल्याचे खात्री झाल्याने गुन्हे शोधपथकाने जीव धोक्यात घालून दरवाजास आत कडी लावलेली असल्याने गुन्हेशोध पथकाचे अनुपम जाधव, भास्कर पवार यांनी दरवाजा तोडुन आत प्रवेश केला. संशयित इसम गणेश बाजीराव केदारे हा लोखंडी पहार घेऊन कपाट तोडत होता. त्याने पोलीस पथकाला बघताच पहार टाकून बंगल्यामधील जिन्याच्या साह्याने बंगल्याच्या टेरिसवर गेला. त्यापाठोपाठ अनुपम जाधव व भास्कर पवार यांनी त्याचा पाठलाग केला. गणेश केदारे याने पळून जाण्यासाठी सरळ टेरेस वरून खाली उडी मारली. त्यापाठोपाट जाधव व पवार यांनी टेरेसवरून खाली उडी घेतली व केदारेला पकडल. दुसरा इसम गणेश शकर पुजारी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. सदर प्रकारावरु न किशोर बाबुराव कोतकर यांचे फिर्यादीवरु न ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे करत आहे.---------------------------------संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेसंशयित गणेश केदारे याला ताब्यात घेऊन त्याला पोलीस खाक्या दाखवला असता तो व त्याचा साथीदार सदरच्या घरात चोरी करण्यासाठी आले सांगितले. गणेश बाजीराव केदारे (२७, राहणार सध्या वैदू वाडी म्हसरूळ) व गणेश शंकर पुजारी (राहणार शनी मंदिर झोपडपट्टी पेठरोड) अशी संशयितांची नावे असून त्यांनी नाशिक शहरात घरफोडया केल्याचे सांगितले. दोघांवर नाशिक शहर पंचवटी पोस्टेशनमध्ये पांच घरफोडीचे गुन्हे तसेच आडगाव पोस्टेशनला सहा गुन्हे तसेच सरकार वाडा व गंगापूर पोलीस स्टे हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक