शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सराफांची महापालिकेविरोधात जनहित याचिकेची तयारी ; फूल बाजार हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 14:45 IST

सराफ बाजारातील या समस्यांवर महापालिका प्रशासनाक डे वारंवार पाठपुरवार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सराफांनी एकत्र येऊन महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून तीस दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे सराफांची महापालिकेविरोधात कायदेशी लढयाची तयारी जनहित याचिका करण्याचा असोशिएशनच्या बैठकीत निर्णय

नाशिक : गेल्या दोन महिन्यात दोनदा सराफ बाजार पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी आता महापालिकेविरोधात कायदेशीर लढा देण्याची तयारी केली असूून त्यासाठी व्यापारी व पर्यावरण अभ्यासकांची तज्ज्ञ समिती नेमूण ३० दिवसांच्या आत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय सराफ व्यावसायिकांच्या बुधवारी (दि.९)बैठकीत  घेण्यात आला आहे. सराफ बाजारात आगस्ट महिन्यात पहिल्याच रविवारी गोदावरीला आलेल्या महापुराने सराफ बाजारात पाणी घुसून अनेक सराफी पेढ्या पाण्याखाली गेल्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याच आपत्तीची परतीच्या जोरदार  पावसामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या रविवारी पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ६ ऑक्टोबरला गोदावरीला पूर नसतानाही सराफ बाजारात तीन ते चार फूट पाणी साचून अनेक दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे पुन्हा मोठे नूकसान झाले. त्यामुळे व्यापाºयांमध्ये महापालिका व्यवस्थापनाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून ही पूरपरिस्थिती भूयारी गटार आणि पावसाळी नाल्यांचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने उद्भवत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे सराफ बाजारात बसणाऱ्या फुलविक्रेत्यांचे या भागात मोठ्या प्रमामात अतिक्रमण असून त्यांच्यामुळे सराफ व्यावसायिकांना वाहतूक कोंडीसह वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र सराफ बाजारातील या समस्यांवर महापालिका प्रशासनाक डे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर सराफांनी एकत्र येऊन महापालिकेविरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करून तीस दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत पर्यावरण प्रेमी व अभ्यासक देवांग जाणी, समीर गायधनी. हेमंत जगताप, नाशिक सराफ असोसिएश्नचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, घाऊक किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, मेहूल थोरात, सचीन वडणेरे, गिरीश नवसे, फेरीवाला व्यस्थापनसमितीचे राजेंद्र दिंडोरकर आदिंचा समावेश असून ही समिती सराफ बाजारातील पूर परिस्थिती आणि अतिक्रमाणांचा सर्वांगीन अभ्यास करून तीस दिवसांच्या आत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली.  

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMarketबाजारjewelleryदागिनेfloodपूरbusinessव्यवसाय