वणी शहरातील शिंपी गल्लीत सौभाग्य जैन ज्वेलर्स नावाचेे संजय मांगीलाल जैन यांचे दुकान असून, मंगळवारी (दि. २१) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दुकानात ३० ते ३५ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्ती स्कुटीवरुन आल्या. त्यांनी दुकानातील सोने, चांदीच्या वस्तू बघत ६.६३ व ४.६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या तसेच ५७.८०० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजण असे एकूण ६३ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने खरेदी केले. आमच्याकडे रोख पैसे नसल्याने आम्ही फोन पेद्वारे ऑनलाईन पेमेंट करीत असल्याचे सांगितले. त्यांनी ७०४१८१५७४४ या क्रमांकाच्या मोबाईलवरूनवरुन, फिर्यादीचा भाऊ मयुर जैन यांच्या ८८०५६४७०४४ या मोबाईलवर क्रमांकावर ६३,५०० रुपये फोन पेने ऑनलाईन पेमेंट केल्याचा बनावट मेसेज टाकला. पैसे पे केल्याचा मेसेज फिर्यादीस दाखवला व खरेदी केलेल्या वस्तू घेत स्कुटीवरून पळून गेले. ज्यांच्या नंबरवर फोन पे केले ते मयुर जैन हे बाहेरगावी कार्यक्रमात असल्याने त्यांनी फोन पे सक्सेसचा मेसेज आल्याने त्यांनी मेसेज गर्दीत वरचेवर बघितला. त्यानंतर त्यांनी खात्यात पैसे जमा झाले की नाहीत, याबाबत मेसेजनंतर दहा ते पंधरा मिनिटांनंतर खात्री केली. मात्र, पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा न झाल्याचे दिसल्यानंतर संबंधित इसमांनी पाठवलेला फोन पेचा मेसेज बनावट असून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
इन्फो
सीसीटीव्ही फूटेजची तपासणी
याबाबत संजय जैन यांनी वणी पोलिसांत बुधवारी (दि. २२) दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, दुकानात असलेले सीसीटीव्ही व जवळपासच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी घेतले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे अधिक तपास करीत आहेत.
फोटो- २३दिंडोरी क्राइम
230921\23nsk_22_23092021_13.jpg
फोटो- २३दिंडोरी क्राइम