शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामनगरच्या सरपंचपदी संपत खताळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 13:23 IST

निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संपत खताळे तर उपसरपंचपदी संगिता मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निफाड : तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संपत खताळे तर उपसरपंचपदी संगिता मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवीन सरपंच व उपसरपंच निवडीसाठी श्रीरामनगर ग्रामपंचायत कार्यालयात निफाडचे मंडल अधिकारी सोमनाथ खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. श्रीरामनगर ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच भगवान शिंदे व उपसरपंच शिला काळे यांनी अंतर्गत ठरलेल्या रोटेशन पध्दतीने आपल्या पदाचे राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या सरपंच व उपरपंचपदाच्या निवडीसाठी निफाडचे मंडल अधिकारी सोमनाथ खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात बोलविण्यात आली होती.निवडणूक कार्यक्र म पत्रिकेनुसार विहीत मुदतीत सरपंच पदासाठी संपत नाना खताळे यांनी तर उपसरपंच पदासाठी संगिता मधुकर शिंदे यांनीच आपआपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ खैरे यांनी सदरची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली.बिनविरोध निवडीची घोषना होताच उपस्थित समर्थकांनी प्रचंड फटाक्याची आतषबाजी करीत व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भिमराज काळे ,भगवान शिंदे ,ज्ञानेश्वर गाडेकर,शिलाताई काळे ,शोभा शिंदे ,मंदाकिनी हंडोरे ,सांगिता पवार,यांच्यासह कामगार तलाठी शंकर खडांगळे ,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बोरगुडे हे उपस्थित होते. नविनर्वाचित सरपंच,उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला

टॅग्स :Nashikनाशिक