शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगी देवी : ट्रस्टतर्फे भाविकांना कॅरिबॅगचा वापर टाळण्याचे आवाहन गडावर प्लॅस्टीकमुक्तीचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:24 IST

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आजपासून ‘प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तशृंगगड’चा श्री गणेशा करण्यात आला.

ठळक मुद्देअस्तित्व कंपनीकडे काम स्वच्छता बंधन धागा’ बांधला

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आजपासून ‘प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ व सुंदर सप्तशृंगगड’चा श्री गणेशा करण्यात आला. यापूर्वीच गड ९० ते ९५ टक्के प्लॅस्टिकमुक्त झाला आहे. परंतु अजून कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामपंचायत व संस्थानच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविणार असून, त्याचा आज श्रीगणेशा करण्यात आला. या मोहिमेसाठी येणारा खर्च ग्रामपंचायत व देवी संस्थान मिळून करणार असून, नाशिक येथील अस्तित्व कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले असून, स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ४० पुरुष व महिला कर्मचाºयांची स्वच्छतेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत दिवसभर संपूर्ण गावात साफसफाई करण्यात येणार आहे. तसेचयेथे असलेल्या सर्व ग्रामपंचायत व ट्रस्ट पदाधिकाºयांना ‘स्वच्छता बंधन धागा’ बांधण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश बर्डे, गिरीश गवळी, जगन बर्डे, बाळासाहेब व्हरगळ, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, ट्रस्टचे कर्मचारी शिंदे बापू, पगार, जाधव, दिलीप पवार, शांताराम गवळी, ग्रामसेवक रतिलाल जाधव, व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक महिन्यापूर्वी सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकाºयांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी ट्रस्ट व ग्रामपंचायतीला विचारला होता. याचीच कडक अंमलबजावणी करत प्लॅस्टिकमुक्त सप्तशृंगगड करणार असून, याबाबत ट्रस्टने व ग्रामपंचायतीने त्वरित पाऊल उचलून स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. पहिल्या पायरीजवळ ग्रामपंचायतीचे उपसंरपच राजेश गवळी व ट्रस्टचे व्यवस्थापक सूदर्शन दहातोंडे व अस्तित्व ग्रुपचे सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीत नारळ फोडून साफसफाईचा श्री गणेशा करण्यात आला. ‘अभियान प्रदूषण मुक्ततीचे, सप्तशृंगगडाचे पावित्र्य सांभाळा, प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर टाळा’ असा संदेश यावेळी देण्यात आला.