शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:11 IST

श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवरून यावर्षी सुरू असलेले वाद-विवाद विजयादशमीला मिटले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हद्दीत बोकडबळी देत प्रथा व परंपरा कायम ठेवली.

कळवण : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवरून यावर्षी सुरू असलेले वाद-विवाद विजयादशमीला मिटले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हद्दीत बोकडबळी देत प्रथा व परंपरा कायम ठेवली.श्री सप्तशृंगी निवासिनी देवस्थानला जिल्हा व तालुका प्रशासनाने बोकडबळी देण्यास विरोध केला असल्याने सप्तशृंगगडावर विजयादशमीला ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, सप्तशृंगगड ग्रामस्थ व भाविकवर्गाने सप्तशृंगी निवासिनी देवस्थानच्या हद्दीबाहेर ग्रामपंचायत हद्दीत परंपरागत चालत आलेला बोकडबळी देत जिल्हा व तालुका प्रशासनाचा आदेश झुगारून प्रथा व परंपरा कायम ठेवली. श्री सप्तशृंगी देवस्थानमार्फत दिला जाणारा बोकडबळी महसूल प्रशासनाने यंदापासून बंद केला असला, तरी सप्तशृंगगड ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी देवस्थान हद्दीबाहेरील सुरक्षित जागेवर सालाबादप्रमाणे होणारे सर्व विधी व परंपरेनुसार बोकडबळी दिला. नवरात्रोत्सव व बोकडबळी या प्रथा- परंपरेसाठी होणाºया विधीच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट स्थापन होण्याच्याही आधीपासून नवरात्रोत्सवाची सांगता होमहवन पूर्णाहुती सोहळ्यासह बोकडबळीने करण्याची परंपरा सप्तशृंगगडावर होती. दसºयाच्या निमित्ताने सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत बोकडाची शिवालय तलाव ते मारुती मंदिर व पहिली पायरी अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कळवण तालुक्यातील देवळी बिलवाडी येथील आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य, ढोल-ताशे व भोवाडा पथकाने दिलेल्या करमणुकीच्या मेजवानीने उपस्थित खूश झाले.