शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर दरड कोसळली!

By admin | Updated: June 13, 2017 00:42 IST

संरक्षक जाळीने तारले : जीवितहानी नाही; दोन मोठे दगड वरच अडकले

लोकमत न्यूज नेटवर्कसप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले साडेतीन पीठांमधील अर्धेपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजता मोठी दरड कोसळली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी झाली नाही. मंदिर परिसरात भाविकांच्या रक्षणासाठी ज्या संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या आहेत त्यामध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला. कोसळलेल्या एका दगडाचे वजन अंदाजे पाचशे ते सहाशे किलो आहे. सप्तशृंगगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंदिराच्या जवळच असलेले दोन कडे हे सुटलेले असल्याने त्यांच्यासाठी संरक्षक जाळी लावण्यात आली होती. सोमवारी चार वाजेच्या सुमारास पाऊस थांबला. पावणेपाच वाजता प्रचंड आवाजाने गड हादरला. काय होते आहे, हे कळण्याच्या आतच मंदिराच्या बाजूला सुटलेल्या दोन कड्यांपैकी एक दरड वेगाने खाली आली. मंदीर आणि भाविकांच्या संरक्षणासाठी या परिसरात संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. या जाळीत कोसळलेल्या दरडीचे दोन दगड अडकले आणि मंदीर व भाविकांवरील संकट टळले. ही संरक्षक जाळी नसती तर दरड सरळ मंदिराच्या परिसरात कोसळली असती व मंदिराची हानी मोठ्या प्रमाणात झाली असती. ज्यावेळी दरड कोसळली तेव्हा मंदिरात थोडेच भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. दरड कोसळताच सर्वांनी पळ काढला. दरड कोसळल्याच्या आवाजाने सर्व ग्रामस्थ व व्यापारी बांधवांमध्ये घबराट पसरून ते रस्त्यावर आले. परंतु कुठलीही हानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भगवतीचे दर्शन सुरळीत दरड कोसळल्यानंतर सर्वच भाविकांनी गडाखाली धाव घेतली मात्र हे दगड संरक्षक जाळीमध्ये अडकल्याचे समजताच सर्वांना हायसे वाटले. या घटनेनंतर काही काळ गडावर कोणी जात नव्हते; पण कालांतराने दर्शन पुन्हा सुरू झाले.