शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:35 IST

चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली

ठळक मुद्देकामगिरी : वर्षातील चौथे आंतरराष्ट्रीय  पदक. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर

साऊथ एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत संजीवनीला सुवर्णनाशिक : चीन येथील स्पर्धेत ब्रांझ पदकावर समाधान मानाव्या लागलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधव हिने अखेर भूतान येथील साऊथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या पदकामुळे संजीवनीने आणखी एक इंटरनॅशनल पदक पटकाविले. नेपाळ आणि श्रीलंका या संघांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.कॉमनवेल्थसाठीची पात्रता मिळू न शकल्याने निराश न होता संजीवनीने आंतरराष्ट्रीय  स्पर्धांमध्ये पदकांची कमाई सुरूच ठेवली आहे. चीन येथील एशियन क्रॉसकंट्री स्पर्धेत ब्रांझ पदक मिळविलेल्या संजीवनीने साऊथ एशियनमध्ये सुवर्ण पदक पटकावत आगामी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा सूचक इशारा दिला आहे.साऊथ एशियनमध्ये ८ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत संजीवनीला शारीरिक क्षमता आणि प्रबळ मनोबल दाखविण्याची संधी असल्याने तिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. या कामगिरीमुळे संजीवनीला आणखी एक आंतरराष्ट्रीय पदक मिळाले असून, या हंगामात तिने आतापर्यंत सहा विविध पदके मिळविली आहेत.कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अवघ्या काही अंतरामुळे हुकल्याने नाशिककरांना हळहळ वाटली होती. तिनेदेखील अनपेक्षित पराभव असल्याचे सांगत आगामी स्पर्धांमध्ये जिद्दीने खेळण्याचे आश्वासन तिच्या चाहत्यांना दिले होते. त्यानुसार भूतान येथील स्पर्धेत तिने थेट सुवर्ण पदक जिंकत अ‍ॅथलेटिक्स आणि क्रॉसकंट्री स्पर्धेत भारताचे नाव उंचावले आहे. तिच्या या कामगिरीमुळे प्रशिक्षक वीजेंद्रसिंग यांनी समाधान व्यक्त केले असून, कॉमनवेल्थचे स्वप्न भंगलेले असतानाही संजीवनीने ज्या जिद्दीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौशल्य दाखविले आहे. धावण्याचे सातत्य आणि विक्रमी वेळ प्रस्थापित करण्यासाठी संजीवनीने नाशिकमध्ये कसून सराव केला असून, या सरावाचा तिला लाभ होत आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिचे नाशिक अ‍ॅथेलेटिक्स आणि महिंद्राच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा