शेतकरी संघाची पदाधिकारी निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदादेखील कायम राहिली असून, दोघेही पदाधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदार आहेर, भाजप नेते सुधाकर पगार यांचे विश्वासू सहकारी आहेत.
शेतकरी संघाचे विद्यमान सभापती राजेंद्र पवार, उपसभापती माणिक देवरे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापती व उपसभापतीपदासाठी संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात येऊन निवडणूक बिनविरोध करण्यात आली . शेतकरी सहकारी संघामध्ये भाजपचे वर्चस्व असून, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पदाधिकारीदेखील संचालक मंडळात प्रतिनिधित्व करीत आहेत.
-------------
कळवण शेतकरी सहकारी संघाच्या सभापतीपदी संतोष मोरे आणि उपसभापतीपदी प्रल्हाद शिवदे यांची निवड करण्यात आली. यावेळी जिभाऊ वाघ, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. (२५ कळवण शेतकी संघ)
===Photopath===
250221\25nsk_16_25022021_13.jpg
===Caption===
२५ कळवण शेतकी संघ