वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखडा येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी निमित्त संत एकनाथी भागवत कथा सप्ताह विविध धार्मिक कार्यक्र मांनी उत्साही व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने शुक्र वार (दि.२६ एप्रिल) ते गुरूवार (दि.२ मे)े दरम्यान भागवत चेतन महाराज बोरसे यांचे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. तर सैय्यद महाराज जलाल यांच्या हरिकीर्तनाने एकनाथी भागवतकथा व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. दि. २ रोजी सकाळी टाळ कृकुंगाच्या गजरात ग्रंथ दिंडी व संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेची नगरप्रदक्षिणा करण्यात आली.कार्यक्र म यशस्वीतेसाठी खंडेराव सुर्यवंशी, सोपान सोनवणे समस्त भजनी मंडळ व आयोजक कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले.(फोटो ०२ वरखेडा) वरखेडा येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेची काढण्यात आलेले नगरप्रदक्षिणेत सहभागी ग्रामस्थ.
संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 17:03 IST
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखडा येथे संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी निमित्त संत एकनाथी भागवत कथा सप्ताह विविध धार्मिक कार्यक्र मांनी उत्साही व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी
ठळक मुद्देवरखेडा येथे धार्मिक वातावरणात