शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे टमाट्यावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:13 IST

दिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून, त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून, फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देबळीराजा हवालदिल : करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव; फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी/लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सुरू असलेल्या संततधारेमुुळे टमाटा पीक धोक्यात आले असून, त्यावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून, फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात टमाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यंदा कोरोनामुळे नर्सरीमध्ये बुकिंग करूनही टमाटा रोपे न मिळाल्याने बळीराजाला पीक घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. मिळेल त्या ठिकाणाहून रोपे आणून नागपंचमीला बहुसंख्य शेतकऱ्यांनी टमाटा लागवड केली.नगदी पीक म्हणून टमाटा पिकाकडे पाहिले जाते. सुरुवातीच्या पावसावर शेतकरीवर्गाने महागडी रोपे आणून अर्ली टमाट्याची लागवड केली. पिकाची वाढ चांगल्याप्रकारे होत असतानाच पावसाने दडी मारली. याही अवस्थेत शेतकरीवर्गाने जिवाचे रान करीत पीक वाचविले. पीक ऐन बहरात असतानाच पावसाची रिपरिप सुरू झाली. सततच्या संततधार पावसाने अर्ली व नूतन लागवड केलेल्या टमाटा पिकावर संक्रांत आली. पिकावर करपा, बुरशी रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसून येत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. लहान टमाटा पिकाला बुरशी रोगाने विळखा दिल्याने झाडांची वाढ खुंटली आहे. तसेच अर्ली म्हणजे नागपंचमीला लागवड केलेल्या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत असली तरी झाडांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. झाडांना लागलेल्या फूलकळीत पावसाचे पाणी साचून कळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, फूलकळी गळून पडत आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी टमाटा बाजारपेठेत विक्रीसाठी आणला आहे. आवक कमी असल्यामुळे दरही चांगला मिळत आहे. परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळधारणेवर परिणाम झाला असून, शेतकरीवर्गाची आशेची निराशा होण्याचे चित्र दिसत आहे.संततधार पावसामुळे पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करीत आहे. परंतु पावसाचा मारा सुरू असल्याने फवारणी केलेले औषध पाण्याने धुऊन जात असल्याने शेतकरीवर्गाची डोकेदुखी वाढली आहे. शेतशिवारात चिखल असल्याने शेतात वाहने जात नाही. सर्व कामे बळीराजा स्वत:च्या ताकदीच्या आधारे करीत आहे. पिकांचे नुकसानसतत होणारा पावसामुळे करपा, बुरशी आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढला, अर्ली टमाट्याच्या झाडांना लागलेल्या फूलकळीत पावसाचे पाणी साचून कळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान रोपांवर बुरशी व आळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने पीक वाचवण्यासाठी शेतकरीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या टमाटा पिकाकडे सर्व लक्ष केंद्रित केले आहे. मात्र पिकावर करपा, व्हायरस, बुरशीचाप्रादुर्भाव तसेच फूलकळी कुजण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे उपन्नवाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती आहे.- संदीप मोगल,टमाटा उत्पादक, लखमापूर

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी