शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक  विभागातील  १९० शाळांनी गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:14 IST

विभागातील तब्बल १९० शाळांमधील विविध शाखांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अशाप्रकारे शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमध्ये नाशिकमधील सुमारे ८८ शाळांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

नाशिक : विभागातील तब्बल १९० शाळांमधील विविध शाखांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अशाप्रकारे शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळांमध्ये नाशिकमधील सुमारे ८८ शाळांचा समावेश असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील नाशिकचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राज्यस्तरीय निकालाच्या क्रमवारीत नाशिक विभाग सातव्या क्रमांकावर असला तरी नाशिक शहरासह विभागातील अनेक शाळांमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विभागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा एकदा दिसून आली आहे.बारावीच्या निकालात शंभर टक्के निकाल लागलेल्या बहुतांश शाळांमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचाच बोलबाला असून, जवळपास दीडशेहून अधिक शाळांमध्ये विज्ञान शाखांचेच शंभर टक्के निकाल लागले आहेत, तर अन्य शाळांमध्ये कला अथवा वाणिज्य शाखांसोबत विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे.स्वतंत्रपणे कला व वाणिज्य शाखांचा शंभर टक्के निकाल लागणाºया शाळांची संख्या मात्र अगदीच अल्पप्रमाणात असल्याचे २०१९च्या निकालातून समोर आले आहे. नाशिकमधून शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होणाºया शाळांमध्ये अशोक युनिर्व्हसल स्कूल अ‍ॅड ज्यु. कॉलेज, वडाळा व चांदशी या शाळांसह ग्लोबल इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अ‍ॅड ज्यु. कॉलेज, मातोश्री ज्युनियर कॉलेज, म्हसरूळ, परमानंद पाटील ज्युनियर कॉलेज, विस्डम स्कूल अ‍ॅड ज्यु. कॉलेज, स्वामी नारायण इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅड ज्यु. कॉलेज, डॉ. एम. एस. गोसावी ज्यु. कॉलेज, बॉइज टाउन पब्लिक स्कूल अ‍ॅड ज्यु. कॉलेज, नूतन विद्यामंदिर अ‍ॅड ज्यु. कॉलेज देवळाली कॅम्प यांसह विविध महाविद्यालयांच्या ८४ शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नाशिक विभागातून सुमारे १०६ शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विज्ञान शाखेचा : सर्वाधिक निकालविभागात विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९४.०२ टक्के निकाला लागला आहे. विज्ञान शाखेतून ७६ हजार ६६२ पैकी ६३ हजार ६१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे, तर कला शाखेतून ६३ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ४६ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण सर्वांत कमी ७२.७४ टक्के आहे. वाणिज्य शाखेतून २२ हजार ६१२ पैकी २० हजार ४९६ म्हणजेच ९०.६४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व्यावसायिक अभ्यासक्रमातून चार हजार ६१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे प्रमाण ७५.२८ टक्के आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालNashikनाशिक