शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाच्या सरासरीने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:50 IST

जिल्ह्यात यावर्षी देवळा आणि मालेगाव तालुका वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने आॅगस्ट महिन्यातच पावसाच्या सरासरीने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०१ टक्के पाऊस झाला असून धरणातील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

नाशिक : जिल्ह्यात यावर्षी देवळा आणि मालेगाव तालुका वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने आॅगस्ट महिन्यातच पावसाच्या सरासरीने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०१ टक्के पाऊस झाला असून धरणातील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे.यंदा जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून धरणांची पातळीही समाधानकारक आहे. हंगामात सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक तालुक्यात १६१ टक्के झाली आहे. त्या खालोखाल सुरगाणा ११९, इगतपुरी १०७, दिंडोरी आणि पेठ १०६, नांदगाव १०३, सिन्नर १००, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ९८ टक्के पाऊस झाला आहे. कळवण, निफाड आणि येवला तालुक्यात ८० टक्क्यापेक्षा जास्त तर चांदवड आणि बागलाण तालुक्यात ७५ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मालेगाव तालुक्यात ५७ तर देवळा तालुक्यात ५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३ मिमी असून आतापर्यंत १०३३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात देखील समाधानकारक वाढ झाली असून एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर या धरणांत उपयुक्त साठ्याने शंभरी ओलांडली आहे. तर दारणा, गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, पुणेगाव प्रकल्प आणि नांदूरमधमेश्वर बंधाºयात ९५ टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. पालखेड आणि पूनद धरण ८५ टक्क्यापेक्षा जास्त भरले आहे. गिरणा प्रकल्पात ६३, मुकणे प्रकल्पात ७८, माणिकपुंज प्रकल्पात ७३ तर नागासाक्या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.