नाशिक : पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेत नाशिकच्या एकलव्य अॅथलेटिक्स स्पोर्टस इन्स्टिट्यूटची संजीवनी जाधव हिने सुवर्णपदक मिळवितानाच वैयक्तिक उत्कृष्ट वेळेची नोंदही केली. या स्पर्धेतील तिचे सलग दुसरे पदक आहे.एशियन स्पर्धेनंतर प्रदीर्घ कालावधीनंतर संजीवनी मैदानावर उतरली असून, अत्यंत आत्मविश्वासाने तिने पटियाला येथील स्पर्धेत दमदार कामगिरी केली. पाच हजार मीटरमध्ये ब्रॉँझ मेडल मिळविणाऱ्या संजीवनीने याच स्पर्धेत दहा हजार मीटरमध्ये सुवर्णपदक आपल्या नावावर केले. मागील वर्षी संजीवनीने देशांतर्गत तसेच परदेशातील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत जकार्ता येथील एशियन गेम्समध्ये सहभाग नोंदविला होता. त्यानंतर संजीवनी चार महिन्यांपासून मैदानापासून दूरहोती.सध्या ती धुळे येथील क्रीडा कार्यालयात तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असून, या स्पर्धेसाठी तिने नाशिकमध्येच सराव केला होता.
संजीवनीला सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:52 IST
पटियाला येथे सुरू असलेल्या फेडरेशन कप स्पर्धेत नाशिकच्या एकलव्य अॅथलेटिक्स स्पोर्टस इन्स्टिट्यूटची संजीवनी जाधव हिने सुवर्णपदक मिळवितानाच वैयक्तिक उत्कृष्ट वेळेची नोंदही केली. या स्पर्धेतील तिचे सलग दुसरे पदक आहे.
संजीवनीला सुवर्ण
ठळक मुद्देफेडरेशन कप स्पर्धा : वैयक्तिक उत्कृष्ट वेळेची नोंद