नाशिक : पिंपळगाव येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयातून बनावट जी.अे(जिब्रॅलिक अॅसीड)ची विक्री केल्याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी या समूळ बनावट औषधे बनविण्यामागे असलेला मास्टर मार्इंड मूळ सोलापूर जिल्'ातील असल्याचे समजते. तसेच ज्या कंपनीची ही बनावट जी.अे. कीटकनाशक औषधे बनविण्यात आली ती कंपनी चीनची असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे चीनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. द्राक्ष वाढीसाठी आवश्यक असलेले जी.अे. (जिब्रालिक अॅसिड) संजीवकाच्या पिंपळगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील अहेर व प्रमोद निकम यांनी द्राक्ष बागायतदार संघाच्या विक्री केंद्रावरून १० ग्रॅम जी.अे. या द्राक्ष वाढीसाठी आवश्यक असलेल्या संजीवकाची खरेदी केली होती. त्यांना संशय आल्याने त्यांनी तत्काळ याबाबत द्राक्ष बागायतदार संघाकडे याबाबत तक्रार केली. द्राक्ष बागायतदार संघाकडे तक्रार केल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाने याबाबत जिल्हा परिषदेच्या गुणवत्ता तक्रार व निवारण कक्षाकडे तक्रार केली. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी द्राक्ष बागायतदार संघाच्या विक्री केंद्रावर या संजीवकांची विक्री करणाऱ्या चंद्रभान श्रीधर हांडोरे यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या जी.अे.च्या बाटल्या व द्राक्ष बागायतदार संघाच्या गुदामातील बाटल्या यापैकी प्रत्येकी एक बाटल्यांचे नमुने घेऊन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ठाणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला. त्यात हांडोरे यांच्याकडील जप्त केलेले जी.अे. संजीवक बनावट असल्याचे तर द्राक्ष बागायतदार संघाकडील जी.अे. हे मूळ असल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा सूत्रधार संबंधित कंपनीतील पुणे स्थित कार्यरत एक सेवानिवृत्त अधिकारी असून तो मूळचा सोलापूर जिल्'ातील असल्याची चर्चा आहे. सोलापूरच्या कृषी विभागानेही याच कंपनीच्या बनावट औषधांप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या औषधांची बनावटगिरी संपूर्ण राज्यभर तसेच देशातही इतरत्र करण्यात आल्याची चर्चा असून, पोलिसांच्या पंचनाम्यात संबंधित जी.अे. या संजीवकांच्या बाटल्यांवर चीन येथील युनान हुयान इंटरनॅशनल असे लेबल आढळल्याने हे उत्पादन चीनमध्ये झाल्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
संजीवक बनवेगिरीचे धागेदोरे चीनपर्यंत? मास्टर मार्इंड सोलापुरात
By admin | Updated: November 30, 2014 00:49 IST