कळवण : नगरपरिषदेकडे वाटचाल करणार्या कळवण बुद्रुक ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदाची आज निवडणूक होऊन त्यात उपसरपंचपदावर सत्ताधारी महाराज गटातील काँग्रेसचे संजय अशोक पगार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच प्रशांत ठाकरे यांनी काम पाहिले. श्री. पगार यांच्या निवडीमुळे उपसरपंचपदासाठी बिनविरोध निवडीची परंपरा कायम ठेवण्यात माजी पंचायत समिती सभापती कौतिक पगार व मजूर संघाचे संचालक योगेश पगार यांना यश आले आहे. यावेळी १७ सदस्यांपैकी विरोधी गटाचे दोन सदस्य अनुपस्थित होते. विद्यमान उपसरपंच बाळासाहेब जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी सदस्य संजय अशोक पगार यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध होऊन श्री. पगार यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे श्री. ठाकरे यांनी घोषित केले. संजय पगार हे कळवण ग्रामपालिकेचे ४९ वे उपसरपंच ठरले. यावेळी महाराज गटातील कार्यकर्त्यांनी फटाके व गुलालाची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी सदस्य योगेश मालपुरे, सदस्य भास्कर पगार, एकनाथ जगताप, रंजना ढुमसे, दिलीप मोरे, अनिता पगार, किरण पगार, ताराबाई आंबेकर व ग्रामविकास अधिकारी आर. व्ही. कुवर आदि उपस्थित होते. यावेळी प्रकाश पगार, शशी पाटील, युवक अतुल पगार, साहेबराव पगार, मोय्योद्दिन शेख उपस्थित होते. (वार्ताहर)
कळवणच्या उपसरपंचपदी संजय पगार
By admin | Updated: May 23, 2014 00:38 IST