शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गोरक्षनगर येथे रंगली सांज पाडव्याची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:08 IST

दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर येथे गुरु वारी (दि.८) सांज पाडव्याच्या निमित्ताने गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.

पंचवटी : दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर येथे गुरु वारी (दि.८) सांज पाडव्याच्या निमित्ताने गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाचे सांज पाडव्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी याकार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावर्षी इंटरनॅशनल म्युझिक लव्हर्स ग्रुपच्या उमेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल सजविली. गायक संतोष जोंधळे, अतुल निकम, गायिका अ‍ॅना कांबळे, कृष्णा शरण आणि गौरी कुलकर्णी यांनी गायलेल्या एकापेक्षा एक सुमधुर गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.  प्रशांत महाले यांनी (किबोर्ड), फारुख पिरजादे (ढोलकी), उमेश खैरनार (आॅक्टो पॅड), नीलेश सोनवणे (गिटार), तर सतीश पेंडसे (तबला) यांनी साथसंगत केली. प्रिन्स जॉनी यांच्या मिमिक्रीने व सोनाली म्हरसळे यांच्या सूत्रसंचलनाने कार्यक्र मास रंगत आली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकDiwaliदिवाळी