शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटायझरने संगणकाचा मजकूर होतो करप्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 01:01 IST

कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक नागरिक वापरातील बहुतांश वस्तूंवर सॅनिटायझर फवारणी केल्यानंतरच त्याचा वापर करतात. अगदी कार्यालयातही प्रत्येक वस्तूचा वापर हा सॅनिटाइज केल्यानंतरच करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अन्य कोणत्याही वस्तूंना सॅनिटाइज केले तरी चालेल, मात्र शासकीय कार्यालयांमधील संगणक स्क्रीन तसेच यूपीएसवर  सॅनिटाइजरची फवारणी करू नये, असे परिपत्रकच शासनाने काढले आहे. 

ठळक मुद्देसुरक्षिततेची काळजी : संगणक सॅनिटायजेशनबाबत शासनाचे निर्बंध; दक्षता घेण्याबाबतच्या सूचना

नाशिक : कोरोनाच्या दहशतीमुळे अनेक नागरिक वापरातील बहुतांश वस्तूंवर सॅनिटायझर फवारणी केल्यानंतरच त्याचा वापर करतात. अगदी कार्यालयातही प्रत्येक वस्तूचा वापर हा सॅनिटाइज केल्यानंतरच करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, अन्य कोणत्याही वस्तूंना सॅनिटाइज केले तरी चालेल, मात्र शासकीय कार्यालयांमधील संगणक स्क्रीन तसेच यूपीएसवर  सॅनिटाइजरची फवारणी करू नये, असे परिपत्रकच शासनाने काढले आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून एकामागोमाग एक विविध पर्यायांचा अवलंब केला जात आहे. रोगाचा फैलाव टाळण्यासाठी सर्वत्र आणि सर्व स्तरावर सॅनिटायझरचा प्रचंड वापर केला जात आहे. बहुतांश नागरिक स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझरची एखादी तरी बाटली स्वत:जवळ ठेवतात. तसेच कार्यालयात गेल्यावर अनेक जण आपल्या बसण्याची खुर्ची, टेबल आणि त्या परिघातील प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करतात किंवा कुणी अपरिचित व्यक्ती येऊन भेटून गेला, तरी काळजीपोटी सॅनिटायजरची फवारणी केली जाते. कार्यालयातही एखादा रुग्ण आढळल्यास संबंधित शासकीय कार्यालयात रोगप्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करण्यात येते. त्यावेळी काही कर्मचारी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून संगणकाच्या मॉनिटरवर सॅनिटायझर फवारणी करतात. मात्र, यासंदर्भात अनेक कार्यालयांमध्ये असे निदर्शनास आले आहे की फवारणी करताना संगणकाच्या मॉनिटर डिस्प्लेच्या आत सॅनिटायझरचा अंश गेल्यास डिस्प्ले खराब होतो. त्यामुळे काही शासकीय विभागातील संगणकच बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की रोगप्रतिबंधात्मक औषधे, सॅनिटायझरची फवारणी करताना ते कोणत्याही संगणकावर पडणार नाही, याबाबत संबंधितांनी दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सामान्यांसाठीही उपयुक्तशासनाने काढलेल्या परिपत्रकात ही सूचना केवळ शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असली तरी खासगी कार्यालयांमध्ये अनेक नागरिक त्यांच्या कार्यालयातही सॅनिटायझरची फवारणी संगणकाच्या मॉनिटरवर करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठीदेखील हा आदेश उपयुक्त ठरणारा आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtechnologyतंत्रज्ञान