नाशिक : राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी तसेच स्थायी समितीसह अन्य समित्यांवरील सदस्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी शुक्रवारी (दि. ६) जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीतील नाराज असलेल्या संगीता राजेंद्र ढगे यांनी माघारी अर्जावर स्वाक्षरी केल्याचे समजते. दरम्यान, आमदार छगन भुजबळ यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी प्रकाश वडजे यांच्या जागी अनुभवी व तीन वेळा निवडून आलेले रवींद्र देवरे यांची निवड निश्चित असून, केवळ आता औपचारिक घोषणा बाकी असल्याचे समजते.
संगीता ढगे यांची अखेर माघार
By admin | Updated: November 8, 2014 00:36 IST