शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा उपनगराध्यक्षपदी संगीता देवरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:45 IST

येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता देवरे यांची शुक्रवारी (दि.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जे.पी. कुवर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पाहिले.

सटाणा : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या संगीता देवरे यांची शुक्रवारी (दि.२७) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार जे.पी. कुवर तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी काम पाहिले.पालिकेच्या मावळत्या उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी पालिका सभागृहात निवडणूक प्रक्रि या पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी संगीता देवरे यांच्या नावाची सूचना नगरसेवक महेश देवरे यांनी आणली. त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे यांनी अनुमोदन दिले. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत देवरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कुवर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.निवडीचे वृत्त सभागृहाबाहेर येताच देवरे यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नंदाळे यांनी नूतन उपनगराध्यक्षा देवरे यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. तर नगराध्यक्ष सुनील मोरे व मुख्याधिकारी हेमलता डगळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन देवरे यांचा सत्कार करण्यात आला. शहर विकासाकरीता शासनाच्या विविध योजना राबविणार असून शहरवासियांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देवरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.  देवरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर देवरे यांची ढोल ताशांच्या गजरात चार फाटा ते मल्हार रोडपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश खैरनार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, कॉंग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगरसेवक राहुल पाटील, दीपक पाकळे, महेश देवरे, आरिफ शेख, बाळासाहेब बागुल, नगरसेविका सुलोचना चव्हाण, डॉ. विद्या सोनवणे, सुरेखा बच्छाव आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक