शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून गाड्या पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:57 IST

शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे

ठळक मुद्दे पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाहतुकदाराला पाच लाख रूपये दंड भरण्याची नोटीसही दिली

नाशिक : गौणखनिजाची व विशेष करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणा-यांच्या विरोधात प्रशासनाने मोहिम उघडून दिवस रात्र वाळूच्या गाड्या पकडण्याचे काम केले जात असताना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाळू माफियांकडून केले जात असून, विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच गाड्या पळविण्याची हिम्मत त्यांनी दाखविल्यामुळे प्रशासनही त्यापुढे हतबल झाले आहे.शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे. असे असले तरी, वाळू माफियांकडून चोरी, छुप्या पद्धतीने बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी व त्यातून पाच पट दंडाची वसुली करण्यासाठी महसूल खात्याने पथक गठीत केले आहेत. प्रत्येक तहसिल कार्यालयाच्या हद्दीत असे पथके कार्यान्वित असून, त्यांच्याकडून दिवस-रात्र महत्वाच्या रस्त्यांवर लक्ष ठेवून गौणखनिजाचे वाहतूक करणारे वाहने पकडली जात आहे. नाशिक तालुक्याच्या पथकाने अशाच प्रकारे काही दिवसांपुर्वी एम. एच. ०४ एफ ४०८२ व एम. एच. ०४ एफडी ८७०३ ही वाहने पकडून नाशिक तहसिलदार कार्यालयाच्या आवारात आणून उभी केली होती. संबंधित तलाठी व मंडळ अधिका-यांनी या गाड्यांचे पंचनामे करून वाहतुकदाराला पाच लाख रूपये दंड भरण्याची नोटीसही दिली होती. परंतु दंड न भरताच प्रशाासनाची नजर चुकवून सदरच्या दोन्ही मालट्रक वाळू माफियांनी पळवून नेले आहेत. विशेष म्हणजे पकडलेल्या गाड्या दंड न भरताच पळून गेल्याची बाब नाशिक तहसिल व प्रभारी प्रातांच्या निदर्शनास दोन दिवसांनी आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापुर्वी नाशिक तहसिल कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक व प्रिंटर चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन प्रांत अधिका-यांनी नाशिक तहसिलच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यालयाच्या आवारात सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत व स्वत: तहसिल कार्यालयानेही कॅमेरे लावलेले असताना आवारातून अवजड दोन मालट्रक पळवून नेण्यात आल्याने सर्वच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक