शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांनी पळविल्या गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 01:51 IST

नाशिक : गौणखनिजाची व विशेष करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाºयांच्या विरोधात प्रशासनाने मोहीम उघडून दिवस रात्र वाळूच्या गाड्या पकडण्याचे काम केले जात असताना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाळू माफियांकडून केले जात असून, विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच गाड्या पळविण्याची हिम्मत त्यांनी दाखविल्यामुळे प्रशासनही त्यापुढे हतबल झाले आहे.

ठळक मुद्देप्रशासन हतबल : जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार

 

 

नाशिक : गौणखनिजाची व विशेष करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाºयांच्या विरोधात प्रशासनाने मोहीम उघडून दिवस रात्र वाळूच्या गाड्या पकडण्याचे काम केले जात असताना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाळू माफियांकडून केले जात असून, विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच गाड्या पळविण्याची हिम्मत त्यांनी दाखविल्यामुळे प्रशासनही त्यापुढे हतबल झाले आहे.शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणाºया वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे. असे असले तरी, वाळू माफियांकडून चोरी, छुप्या पद्धतीने बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी व त्यातून पाच पट दंडाची वसुली करण्यासाठी महसूल खात्याने पथक गठीत केले आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या हद्दीत असे पथके कार्यान्वित असून, त्यांच्याकडून दिवस-रात्र महत्त्वाच्या रस्त्यांवर लक्ष ठेवून गौणखनिजाचे वाहतूक करणारे वाहने पकडली जात आहे. नाशिक तालुक्याच्या पथकाने अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी एम. एच. ०४ एफ ४०८२ व एमएच ०४ एफडी ८७०३ ही वाहने पकडून नाशिक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून उभी केली होती. संबंधित तलाठी व मंडळ अधिकाºयांनी या गाड्यांचे पंचनामे करून वाहतूकदाराला पाच लाख रुपये दंड भरण्याची नोटीसही दिली होती. परंतु दंड न भरताच प्रशाासनाची नजर चुकवून सदरच्या दोन्ही मालट्रक वाळू माफियांनी पळवून नेले आहेत. विशेष म्हणजे पकडलेल्या गाड्या दंड न भरताच पळून गेल्याची बाब नाशिक तहसील व प्रभारी प्रातांच्या निदर्शनास दोन दिवसांनी आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही घटनाजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी नाशिक तहसील कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक व प्रिंटर चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन प्रांत अधिकाºयांनी नाशिक तहसील आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत व स्वत: तहसील कार्यालयानेही कॅमेरे लावलेले असताना आवारातून अवजड दोन मालट्रक पळवून नेण्यात आले आहेत.