शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

आजपासून अभयारण्यांचे द्वार ‘अनलॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:18 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने विविध निर्बंध लागू करीत लॉकडाऊनही घोषित केले होते. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शासनाने विविध निर्बंध लागू करीत लॉकडाऊनही घोषित केले होते. कोरोनाची लाट ओसरू लागल्याचे लक्षात आल्यानंतर विविध जिल्ह्यांमधील स्थिती लक्षात घेऊन टप्पेनिहाय तेथील व्यवहार पूर्वपदावर आणण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, नाशिक वनवृत्तामधील निफाड तालुक्यातील रामसर दर्जाचे नांदूर-मधमेश्वर, अहमदनगरचे कळसूबाई-हरिश्चंद्रगड, जळगावचे यावल आणि धुळ्याचे अनेर डॅम अशा चारही अभयारण्यांमध्ये पर्यटकांसह निसर्गप्रेमी वन्यजीव छायाचित्रकारांना अभयारण्यांच्या नाक्यांवर तपासणी करून आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सध्या नांदूर-मधमेश्वर अभयारण्यात पक्षी निरीक्षणाचा हंगाम नाही, यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. मात्र, वर्षा सहलींसाठी कळसूबाईसह अन्य अभयारण्यांमध्ये पर्यटक वाढण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या रोजगाराला चालना मिळावी, या उद्देशाने अभयारण्यांचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले केले जात असल्याचे अंजनकर यांनी सांगितले.

---इन्फो---

भंडारदऱ्याला वाढणार पर्यटकांचा ओघ

पावसाळ्यात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या भंडारदरा, राजूर वनपरिक्षेत्रात पर्यटकांची संख्या वाढलेली असते. पांजरे, उडदावणे, घाटघर, रतनवाडी या भागांत वन्यजीव विभागाने स्वच्छतागृहांची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जाऊ नये. अभयारण्यात पावसाळी पर्यटन करताना धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढू नये. जागोजागी लावण्यात आलेल्या सूचना फलकांकडे दुर्लक्ष करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे.

---कोट---

कोरोनामुळे गेल्या वर्षी पर्यटनाचा सर्वच हंगाम पाण्यात गेला होता. पावसाळ्याचे चार महिने, तसेच काजवा महोत्सवदेखील झाला नव्हता. यावर्षी किमान पावसाळ्याच्या हंगामात पर्यटनामुळे स्थानिकांना लाभ होण्यास मदत होणार आहे. रोजगारामध्ये वाढ होण्यास मदत होईल. वनखात्याने अभयारण्यांमध्ये परवानगी दिल्याने धबधबे बघण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे, तसेच अजून आठवडाभर काजव्यांची चमचमही अभयारण्यात अनुभवायास येऊ शकते.

-केशव खाडे, गाईड, भंडारदरा

---

फोटो आर वर ०८कळसूबाई१/२