शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:50 IST

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. २१ पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.आदिवासी विकास विभागातील शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून पदनिहाय पात्रता धारण केलेले कर्मचारी अल्पशा मानधनावर कामकाज करीत आहेत. विशेष बाब म्हणून या कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेशदेखील दिले होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून संबंधित विभागातील अधिकाºयांनी भरती आणि बदलीप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे रोजंदारी कर्मचाºयांचा प्रश्न मागे पडून सेवेत कायम करण्याचा प्रश्न मागे पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या मार्च महिन्यात रोजंदारी कर्मचाºयांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, आयुक्त यांच्याबरोबर बैठक झाली होती.यावेळी संघटनेने तीन महिन्यांची मुदत देऊन मागण्या सोडविण्याची विनंती केली होती. यावेळी रोजंदारी कर्मचाºयांना तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्णकरून त्यांना कायम सेवेत सामावून घेतले जाईल असे ठरविण्यातआले होते; मात्र आता या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप रोजंदारी वर्ग-३, वर्ग-४ कर्मचारी संघर्ष संघटनेने केला आहे. याप्रकरणी तत्काळ निर्णय न घेतल्यास दि. २१ पासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. चांदवड सोग्रस फाटा येथून पदयात्रा करीत बिºहाड आंदोलन आयुक्तालयावर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.आदिवासी विकास आयुक्तांना दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष रितेश ठाकूर, महेश पाटील, कमलाकर पाटील, संदीप देवरे, सचिन वाघ, रमण ठाकरे, भगतसिंग पाडवी, संजय जाधव, विजय बागुल, राजाराम बागुल आदींच्या स्वाक्षरी आहेत.जानेवारीपासून वेतनापासून वंचितरोजंदारी कर्मचारी जानेवारी २०१८ पासून वेतनापासून वंचित आहेत. यामुळे कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांचे आश्वासन देऊन आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रagitationआंदोलन