शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमधमेश्वर, कळसूबाईसह उत्तर महाराष्टÑातील अभयारण्ये बंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:24 IST

नाशिक : ताडोबा व्याघ्र प्रकल्प जरी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरीदेखील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्णांतील नांदुरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम हे चारही अभयारण्य पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत जैसे-थे ‘कुलूपबंद’ राहणार आहे

नाशिक : ताडोबा व्याघ्र प्रकल्प जरी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असले तरीदेखील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे जिल्ह्णांतील नांदुरमधमेश्वर, कळसूबाई-हरिश्चंद्रगड, यावल, अनेर डॅम हे चारही अभयारण्य पर्यटकांसाठी पुढील आदेशापर्यंत जैसे-थे ‘कुलूपबंद’ राहणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकसह वरील जिल्ह्णांमधील वनविभागाच्या हद्दीतील दुर्गपर्यटन, निसर्ग पर्यटनावरही बंदी कायम आहे.कोरोनाचे संक्र मण राज्यात अधिक वेगाने वाढत असून, सध्या पावसालाही सुरुवात झाली आहे. यामुळे अभयारण्यांच्या परिसरातील निसर्गसौंदर्यही खुलले आहे. यामुळे हौशी पर्यटकांची पावले वर्षासहलींचा आनंद घेण्यासाठी अभयारण्यांकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वन-वन्यजीव विभागाच्या नाशिक वनवृत्तात येणाऱ्या वरील चारही जिल्ह्णांमधील अभयारण्य, राखीव वनक्षेत्र, दुर्ग परिसरात पर्यटनावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.दि. १६ मार्चपासून वरील अभयारण्यांच्या वाटा पर्यटक, निसर्गप्रेमी, वन्यजीव छायाचित्रकारांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.---------------------स्थानिक : गावकऱ्यांचाही पाठिंबाबहुतांश गावे कोरोनाच्या संक्र मणापासून सुरक्षित राहिलेले आहे. यामुळे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य असो किंवा नांदुरमधमेश्वर अभयारण्य असो या भागातील स्थानिक गावकºयांनीसुद्धा रोजगारावर पाणी सोडणे पसंत केले आहे; मात्र कोरोनाचा शिरकाव आपल्या गावांमध्ये होणार नाही यासाठी पर्यटनबंदीला पाठिंबा दर्शविला आहे.---------------पर्यटनबंदी ही फायदेशीरच आहे. गावकºयांच्या रोजगारावर त्याचा परिणाम नक्कीच झाला आहे; मात्र कोरोनाचे संक्र मण रोखण्यासाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणे योग्यच आहे. गाइडपासून तर गावकºयांपर्यंत सर्वांचीच सुरक्षा जोपासली जाणार आहे.- अमोल दराडे, गाइड, नांदुरमधमेश्वर------------------------कळसूबाई अभयारण्य बंदच आहे. भंडारदरा गावासह सर्वच ग्रामपंचायतींनी पर्यटनबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गावकºयांच्या हिताचा आहे. कोरोनामुळे पर्यटनावर गंभीर परिणाम झाला आहे. ‘पाहुणचार’ मार्चपासून संपूर्णत: लॉकडाऊन आहे.- केशव खाडे, गाइड, भंडारदरा

टॅग्स :Nashikनाशिक