शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:58 IST

येवला शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून, शनिवारी (दि.२५) शहरात कडेकोट लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रविवार (दि. २६) ते मंगळवार (दि.२८) पावेतो तसेच गुरुवार (दि. ३०) ते शनिवार (दि.२ मे) पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा शिरकाव। संपूर्ण लॉकडाउन; रहिवाशांमध्ये खळबळ; जनता कर्फ्यूचे आवाहन

योगेंद्र वाघ।येवला : शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून, शनिवारी (दि.२५) शहरात कडेकोट लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रविवार (दि. २६) ते मंगळवार (दि.२८) पावेतो तसेच गुरुवार (दि. ३०) ते शनिवार (दि.२ मे) पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर वाढत चाललेल्या रुग्ण संख्येने येवलेकरांमध्येही शंकेची पाल चुकचुकत होती. मालेगाव आणि येवला शहराची नातेसंबंधांची नाळ मोठी आहे. मालेगावमध्ये पोहोचलेला कोरोना येवल्यापर्यंत येऊ नये म्हणून शहरवासीय विशेष खबरदारी घेत होते. प्रशासनही सज्ज होऊन आवश्यक उपाययोजना करीत होते. रोज नवनवीन अफवा व चर्चा सुरू होत्या. या दरम्यान, काही संशयितांच्या चाचण्याही झाल्या, परंतु त्या निगेटिव्ह आल्याची माहिती मिळते. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४७ वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आल्याने, सदर महिलेला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. शुक्रवारी संध्याकाळी सदर महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. सदर महिलेची सून गेल्या आठवड्यात येवला ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी आली होती, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला नाशिकला संदर्भ सेवा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, मात्र कुटुंबीयांनी नाशिकला न घेऊन जाता सदर महिलेला बाळंतपणासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात येते. कोरोना विषाणू संसर्ग झालेली ४७ वर्षीय महिला ही गर्भवती महिलेची सासू आहे. दरम्यान, कोरोनाबाधित महिलेच्या कुटुंबीयातील ९ नातेवाइकांना कोरोना तपासणीसाठी नाशिक येथे शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात रविवार (दि.२६) ते मंगळवार (दि.२८) पावेतो तसेच गुरुवार (दि.३०) ते शनिवार (दि.२ मे) पावेतो जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान, बुधवार, दि. २९ एप्रिल व रविवार दि.३ मे रोजी अत्यावश्यक सेवा, भाजीपाला, किराणा सुरू राहतील, असेही समितीने स्पष्ट केले आहे. जनता कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद राहणार असून, शहरहितासाठी शहरवासीयांनी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही सर्वपक्षीय कृती समितीचे राजेश भंडारी, गौरव कांबळे, शैलेश कर्पे, दीपक लोणारी, तरंग गुजराथी, धीरज परदेशी, राजकुमार लोणारी, गुड्डू जावळे, रूपेश घोडके, अविनाश कुक्कर, सुभाष गांगुर्डे, सचिन सोनवणे, बापू गाडेकर, राम बडोदे, मनोज दिवटे, योगेश शिंदे, अतुल घटे आदींनी केले आहे.कोरोना संसंर्गीत रुग्ण सिद्ध झाल्याने प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी एका आदेशाद्वारे शहरातील प्रभाग क्र मांक ५ मधील मिल्लतनगरचे सदरचे ठिकाण केंद्रबिंदू घोषित करून त्याच्यापासून ३ कि.मी. अंतर परिघातील क्षेत्र कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. ५ कि.मी. परिघातील क्षेत्र बफरझोन म्हणून घोषित केले आहे.या क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली असून, प्रवेश आणि निर्गमित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या बरोबरच मास्क आवश्यक करण्यात आले आहे. कंटेनमेंंट क्षेत्रातील सर्व घरांचे सर्वेक्षण निर्धारित वेळेत पूर्ण करणे, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथकाची नियुक्ती करावी, सदर क्षेत्रात चेक पोस्ट व एक्झिट पॉइंटवर आरोग्य क्षेत्रातील पथकाद्वारे सातत्याने तपासणी करावी आदी आदेश प्रांताधिकारी शर्मा यांनी दिले आहेत.प्रांताधिकारी शर्मा यांच्या आदेशानुसार येवला तहसीलदार रोहिदास वारूळे यांनी, कंटेनमेंट क्षेत्र परिसर सील केला असून, दूध आणि अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण परिसर शंभर टक्के लॉकडाउन करून संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश येवला नगरपालिका आणि शहर पोलिसांना दिले आहेत.शेतमाल लिलाव बंदयेवला बाजार समितीने सोमवार, दिनांक २७ एप्रिल रोजी होणारा कांदा, मका व भुसार धान्य लिलाव बंद ठेवला आहे. त्यामुळे कांदा लिलावासाठी वाहन नोंदणीही रद्द करण्यात आल्याचे सचिव व्यापारे यांनी सांगितले.रस्ते ब्लॉकडाउनसुरक्षेचा उपाय म्हणून गल्ली-बोळांसह प्रमुख रस्ते ब्लॉकडाउन केले आहे. ठिकठिकाणी लाकडी बांबू, बल्ल्या, झाडे-झुडपे, बॅरिकेड्स, हातगाड्या, पलंग आदींच्या साहाय्याने नागरिकांनी रस्ते ब्लॉकडाउन केले आहे.पोलीस अ‍ॅक्शन मोडवरकोरोना संसर्गीत रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर दिसून आले. विनाकारण रस्त्यांवर फिरणाºयांना चांगलेच फटकावणे सुरू केले. त्यामुळे बाजारपेठा, रस्ते, चौफुली निर्मनुष्य झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य