शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्यात सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:55 IST

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन, सर्वपक्षीय कृती समिती व्यापारी महासंघ यांनी संयुक्तरीत्या गुरुवारपासून (दि.१४) चार दिवस लागू केलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कळवण शहरासह तालुक्यातील अभोणा, कनाशी, नवी बेज, दळवट, जयदर, देसराणे, मोकभणगी आदी मंडळातील प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला.

कळवण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन, सर्वपक्षीय कृती समिती व्यापारी महासंघ यांनी संयुक्तरीत्या गुरुवारपासून (दि.१४) चार दिवस लागू केलेल्या जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कळवण शहरासह तालुक्यातील अभोणा, कनाशी, नवी बेज, दळवट, जयदर, देसराणे, मोकभणगी आदी मंडळातील प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला. मेडिकल व वैद्यकीय ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी शंभर टक्के बंद ठेवून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कळवण शहरात ११ वर्षाचा पहिला रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे शहर व तालुक्यातील जनता चांगलीच हादरली आहे शिवाय तालुक्याला लागून असलेल्या मालेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ही वाढ धोक्याची घंटा मानली जात आहे. मालेगावात दिवसेंदिवस कोरोना रु ग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनासह जनतादेखील हादरली आहे. त्यामुळे आमदार नितीन पवार, सर्वपक्षीय कृती समिती व्यापारी महासंघ व तालुका प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर ४ दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. कळवण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला मेनरोड, सुभाष पेठ, शिवाजीनगर, गणेशनगर, बसस्थानक, जुना ओतूर रोड, गांधी चौक, अंबिका चौक, फुलाबाई चौक, नेहरू चौक, ओतूररोड, परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्ते बंद केले. जनत कर्फ्यूमध्ये मेडिकल व हॉस्पिटल वगळून बाकी सर्व सेवा बंद असून, शहरहितासाठी जनता कर्फ्यूचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आमदार नितीन पवार, सर्वपक्षीय कृती समितीचे शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार, शिवसेनेचे कारभारी आहेर अंबादास जाधव, साहेबराव पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भामरे, जितेंद्र पगार, काँग्रेसचे महेंद्र हिरे, अतुल पगार, भाजपाचे दीपक खैरनार, निंबा पगार मनसेचे शशिकांत पाटील डॉ. दीपक शेवाळे, छावाचे प्रदीप पगार, किशोर पवार, व्यापारी महासंघाचे मोहनलाल संचेती, जयंत देवघरे, विलास शिरोरे, नितीन वालखडे, सागर खैरनार, संदीप पगार, दीपक महाजन आदींनी केलेआहे.----------------------------------------------रस्ते लॉकडाउनसुरक्षेचा उपाय म्हणून कळवण शहर व तालुक्यातील गल्ली-बोळांसह प्रमुख रस्ते लॉकडाउन केले आहे. ठिकठिकाणी लाकडी बांबू, बल्ल्या, झाडे-झुडपे, बॅरिकेड्स, हातगाड्या, पलंग आदींच्या साहाय्याने नागरिकांनी रस्ते लॉकडाउन केले आहे.पोलीस अ‍ॅक्शन मोडवरकोरोना संसर्गित रु ग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी जनता कर्फ्यूचे पालन केले नाही तर कारवाईचा इशारा दिल्याने शहरात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर दिसून आले. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना फटकावणे सुरू केले. त्यामुळे बाजारपेठा, रस्ते, निर्मनुष्य झाली होती.

 

टॅग्स :Nashikनाशिक