शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

कर्मचाऱ्यांच्या संपाने जिल्हा परिषद ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:31 AM

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने लाक्षणिक संप पुकारण्यात आला.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या संपात १०० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे कामकाज ठप्प झाले. या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत एकत्र जमून जोरदार घोषणाबाजी केली.सातव्या वेतन आयोगाच्या ‘ग्रेड पे’मध्ये सुधारणा करावी, नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक केलेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विकास सेवा श्रेणीच्या नियमात लिपिक वर्गीय कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये ४० टक्के कोटा देण्यात यावा, जिल्हा परिषद कर्मचाºयांना गट विमा योजनेची सुधारित दराप्रमाणे वर्गणीमध्ये वाढ लागू करावी, परिचर, वाहनचालकांना गणवेषापोटी दिल्या जाणाºया रकमेत वाढ करावी, सहायक गट विकास अधिकारी व प्रकल्प अधिकाºयांची रिक्त पदे त्वरित भरावी, सहायक प्रशासन अधिकारी पद निर्माण करावे, केंद्र सरकारप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत, महिला कर्मचाºयांना प्रसूती व संगोपन रजा व अन्य सवलती लागू कराव्यात, अनुकंपा भरती तत्काळ विनाअट करण्यात यावी आदी मागण्यांसाठी जुलै महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी आंदोलन करीत असून, तरीही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सोमवारी एक दिवशीय लाक्षणिक संप करण्यात आला. या संपात जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने दिवसभर कोणतेही कामकाज होवू शकले नाही. सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतदेखील त्याचे पडसाद दिसून आले. सभा सुरू असताना कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी करून पदाधिकारी व अधिकाºयांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी अध्यक्ष प्रमोद निरगुडे, सचिन विंचूरकर, महेंद्र पवार, रामदास भवर, नितीन मालुसरे, संजय सोनवणे, रत्नदीप गोसावी, प्रशांत पगारे, धनराज भोई, राहुल शिंदे, विश्वास कचरे, शिवराम बोटे, ज्ञानदेव देशमुख आदी पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.शाळाही ओसजिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या संपात शिक्षकही सहभागी झाल्याने सोमवारी जिल्ह्यातील ३३२८ प्राथमिक शाळा विद्यार्थी व शिक्षकांविना ओस पडल्या होत्या.जिल्हा परिदेच्या अखत्यारित सतरा हजार कर्मचारी आहेत. त्यात शिक्षक वगळता कर्मचाºयांची संख्या साडेतीन हजार इतकी असून, संपात सर्व कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.स्थायी समितीच्या सभेत पडसादया संपात जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने दिवसभर कोणतेही कामकाज होवू शकले नाही. सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतदेखील त्याचे पडसाद दिसून आले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदStrikeसंप