शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जो जिता वही सिकंदर !

By admin | Updated: February 17, 2017 00:09 IST

जो जिता वही सिकंदर !

 नरेंद्र दंडगव्हाळ  सिडकोसेना-भाजप या प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी वाटपावरून शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेला गोंधळ व त्यातून झालेली बंडखोरी, तीन आजी व तीन माजी अशा सहा नगरसेवकांमध्ये समोरासमोर होणाऱ्या लढतीमुळे प्रभाग क्रमांक २८ मध्ये ‘जो जिता वही सिकंदर’ ठरणार आहे. सिडकोतील प्रभाग २८ मध्ये सेनेचे वर्चस्व असल्यामुळे सुरुवातीपासूनच सेनेकडून व भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे रस्सीखेच होऊन एकमेकांचा पत्ता कापण्यासाठी राजकीय कुरघोड्या करण्यात आल्या. सेनेचे माजी नगरसेवक दिलीप दातीर यांना पक्षाने २७ प्रभागातून उमेदवारी दिली असली तरी, त्यांची पत्नी अरुणा यांनी मात्र सेनेच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रभाग २८ मध्ये बंडखोरी केली आहे. प्रभाग २८ ‘अ’ नागरिकांचा मागासवर्ग या गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, भाजपाकडून माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, माकपाचे गोपाल बडगुजर, कॉँग्रेसकडून अजित गोवर्धने, मनसेचे गणेश मोरे तर राष्ट्रीय समाज पक्षाकडून नवनाथ शिंदे, अपक्ष विशाल शंकर मटाले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सेना विरुद्ध भाजपा व मनसे अशी ही लढत दिसत असली तरी, अन्य उमेदवारांकडून कोणाची मते खेचली जातात यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. अपक्ष विशाल मटाले यांच्या मातोश्री कमल मटाले यांनी काही दिवसांपूर्वीच सेनेत प्रवेश केला होता, परंतु त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने सेनेवर त्यांची नाराजी आहे. ‘ब’ या सर्वसाधारण महिला गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक शीतल संजय भामरे, भाजपाकडून माजी नगरसेवक प्रतिभा बाळासाहेब पवार, मनसेच्या अनिता बाजीराव दातीर अशी तिघांमध्येच लढत होणार आहे. सेनेच्या शीतल भामरे या गेल्या निवडणुकीत मनसेकडून निवडून आल्या होत्या. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे तर प्रतिभा पवार या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून यापूर्वी विजयी झाल्या असून, निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षनिष्ठेचा विचार करता, मतदार कोणाला स्वीकारतात हे महत्त्वाचे आहे. ‘क’ सर्वसाधारण महिला गटातून सेनेकडून विद्यमान नगरसेवक सुवर्णा दीपक मटाले, भाजपाकडून अर्पणा गाजरे, राष्ट्रवादीकडून संगीता कैलास सानप, मनसेच्या लताबाई देवराम आगळे व अपक्ष म्हणून माजी नगरसेवक दिलीप दातीर यांची पत्नी अरुणा दातीर यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सेना विरुद्ध भाजप व बंडखोर अशी लढत होणार असून, दातीर यांच्यामुळे रंगत वाढली आहे. सेनेच्या सुवर्णा मटाले या गत निवडणुकीत मनसेकडून निवडून आल्या होत्या व निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. ‘ड’ सर्वसाधारण खुल्या गटातून सेनेकडून दीपक निवृत्ती दातीर, भाजपाकडून याग्निक नंदलाल शिंदे, मनसेकडून माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले, कॉँग्रेसचे किरण बिडलान, माकपाचे प्रा. डॉ. मिलिंद वाघ व अपक्ष प्रकाश चव्हाण यांच्यात लढत होत आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब मटाले हे एकदा सेनेकडून निवडून आले आहेत, तर त्यांचे बंधू अनिल मटाले हे सध्या मनसेचे नगरसेवक व प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी करीत आहेत.