शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

इगपुरीत संभाजी ब्रिगेडचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:12 IST

समृद्धी महामार्गबाधित शेतकºयाना जास्तीत जास्त मोबदला मिळावा. इगतपुरी, वाडीवºहे, गोंदे औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. भावली धरणाचे पाणी नगर, येवला या ठिकाणी सोडण्यापूर्वी तळेगाव डॅममध्ये सोडून इगतपुरी शहराची तहान भागवावी, अशा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने इगतपुरी शहरात आक्रमक मोर्चा काढला.

इगतपुरी : समृद्धी महामार्गबाधित शेतकºयाना जास्तीत जास्त मोबदला मिळावा. इगतपुरी, वाडीवºहे, गोंदे औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. भावली धरणाचे पाणी नगर, येवला या ठिकाणी सोडण्यापूर्वी तळेगाव डॅममध्ये सोडून इगतपुरी शहराची तहान भागवावी, अशा मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडने इगतपुरी शहरात आक्रमक मोर्चा काढला.देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड, आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा, समृद्धी महामार्गबाधित शेतकºयाना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, सातबारा कोरा झालाच पाहिजे, अशा विविध घोषणा देत हातात संभाजी ब्रिगेडचे झेंडे घेऊन तीन लकडी पुलापासून निघालेला मोर्चा बाजारपेठ, रेल्वे गेट, खालची पेठमार्गे तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चा तहसील कार्यालयात प्रवेश करणाºया मोर्चेकºयांना पोलिसांनी अडवले. यावेळी निवासी नायब तहसीलदार शिंदे संभाजी ब्रिगेडचे निवेदन स्वीकारण्यासाठी आले. तहसीलदार अनिल पुरे यांना आधी कळवूनही मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी का थांबले नाही, असा संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांशी वाद झाला. तहसीलदार येत नाही तोपर्यंत आम्ही गेटवर ठिय्या मांडू, अशी आग्रही भूमिका संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाºयांनी घेतली. पोलिसांनी तडजोडीची भूमिका घेत कार्यालयात निवेदन देण्यास परवानगी दिली. निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्याशी विविध मागण्यांबाबत पदाधिकाºयांनी चर्चा केली. जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जयप्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष कृष्णा घाटोळ, कार्याध्यक्ष भाऊसाहेब शिरोले, नाशिक महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, राजाभाऊ जाधव, नीलेश जगताप, किरण मानके, नीलेश पेलमहाले, गणेश पाटील, शहराध्यक्ष समर सोनार, किरण बर्डे, सचिन बीडकर, दिनेश भांगडे, भगवान माळी, नीलेश जगताप, योगेश सोनवणे उपस्थित होते.