शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

समता परिषद करणार ‘ओबीसी आरक्षणावर चर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

सोमवारी (दि. २१) भुजबळ फार्म येथील कार्यालयात समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय ...

सोमवारी (दि. २१) भुजबळ फार्म येथील कार्यालयात समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहर व जिल्ह्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, वाॅर्ड व प्रभागनिहाय ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्यातील सुमारे ५० हजारांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा कमी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, ओबीसींची जनगणना करणे या विविध न्याय मुद्द्यांवर ओबीसी समाजातील जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्यानुसार समता परिषदेचे पदाधिकारी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची तसेच ओबीसी संघटना व सर्व ओबीसी समाजातील समाज बांधवांच्या भेटी घेऊन चर्चा करणार करणार आहे.

या उपक्रमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार तसेच ओबीसी समाजाच्या विविध पदांवर कार्यरत असलेल्या आजी-माजी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेऊन ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, वाॅर्ड व प्रभागनिहाय बैठका घेणार आहे. त्यानुसार शहर तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावातील चौकाचौकात बैठका घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. या बैठकीस विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, समन्वयक योगेश कमोद, संतोष सोनपसारे, डॉ.योगेश गोसावी, विनोद शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ या उपक्रमाचे समन्वयक म्हणून योगेश कमोद यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच या संदर्भात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक येथे ‘ओबीसी आरक्षण पे चर्चा’ मेळावा आयोजित करणार आहे.