शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीत कावळ्यांच्या तावडीतून वाचविले साळुंकीच्या पिलाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 00:43 IST

मानोरी : एकदा नव्हे, तर दोनदा छोट्याशा जिवाला चोचीत पकडून पलायन करणाऱ्या कावळ्यांच्या तावडीतून दोघा तरुणांनी सुखरूप सुटका करून भूतदयेचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देतरुणांनी सतर्कता दाखवत पुन्हा कावळ्यांच्या घोळक्यावर दगडफेक केली.

मानोरी : एकदा नव्हे, तर दोनदा छोट्याशा जिवाला चोचीत पकडून पलायन करणाऱ्या कावळ्यांच्या तावडीतून दोघा तरुणांनी सुखरूप सुटका करून भूतदयेचे दर्शन घडविले.

"काळ आला होता; पण वेळ आली नव्हती" या म्हणीचा प्रत्यय येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील एका साळुंकीच्या चिमुकल्या पिलाच्या जीव वाचविताना आला. मानोरी बु. येथे सलून दुकानजवळ साळुंकी आपल्या पिल्लाला घरट्यात दाणे भरवत होती. अचानक चार ते पाच कावळ्यांनी या साळुंकीच्या घरट्यावर हल्ला चढवत पिल्लाला घरट्यातून बाहेर ओढत पलायन करण्याचा प्रयत्नकेला.

घरट्यातून पिल्लाला घेऊन कावळे साधारण ४०० ते ५०० फुटांपर्यंत गेले होते. ते दृश्य सलून दुकानजवळ बसलेल्या अमोल शेळके आणि सोपान बिडवे या दोन तरुणांनी पाहताच त्यांनी कावळ्यांना दगड मारण्याचा प्रयत्न केला. कावळे त्या चिमुकल्या पिल्लाला हवेत घेऊन सुमारे ४० ते ५० फुटावरून उडत असताना या तरुणांनी केलेल्या दगडफेकीमुळे कावळ्यांनी पिल्लाला उंचीवरून सोडूनदिले.

मात्र, सदर तरुण पिल्लाजवळ पोहोचेपर्यंत पुन्हा चार ते पाच कावळ्यांनी जमिनीवर पडलेल्या पिल्लावर हल्ला चढवत उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी सतर्कता दाखवत पुन्हा कावळ्यांच्या घोळक्यावर दगडफेक केली. कावळे दुसऱ्यांदा पिल्लाला हवेत घेऊन जात असताना पुन्हा ३० ते ४० फुटावरून पिल्लू जमिनीवर पडले. दोनदा जमिनीवर पडल्यामुळे जखमी पिल्लाला उडता येत नव्हते.प्रसंगावधान राखलेल्या अमोल शेळके आणि सोपान बिडवे या दोन तरुणांनी त्या पिल्लाला अलगद उचलून सलून दुकानात नेले. भयभीत झालेल्या त्या पिल्लाच्या पायातून रक्त वाहत होते. त्यास पाणी पाजले आणि दाणे खाऊ घातले. एक तासानंतर पिल्लाला त्याच्या घरट्यात सोडण्यात आले. अतिउंचावरून दोनदा कावळ्यांच्या तावडीतून जमिनीवर पडलेले पिल्लू केवळ दैव बलवत्तर होते म्हणून वाचविता आल्याचा आनंद संबंधित तरुणांनी व्यक्त केला.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यSocialसामाजिक