येवला : दुष्काळाची पार्श्वभूमी, उन्हाचा तडाखा, पाण्याची तीव्र टंचाई यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा वणवण फिरण्याची वेळ नजीक असताना झाडेदेखील जगली पाहिजेत यासाठी नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी माणसाबरोबरच पर्यावरण समतोल राहण्यासाठी वृक्षाची गरज आहेत.हेच ओळखून परिसरात झाडे लावली आणि ही वृक्ष जगवण्यासाठी लहान मुलासारखे त्याचे संरक्षण करीत त्याला बंदिस्त जाळीत ठेवून त्या वृक्षांना जीवदान देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी रिकाम्या सलाईनमध्ये पाणी टाकून त्यांना कायमस्वरूपी जीवदान मिळेल यासाठी प्रयत्न केला आहे.या दुष्काळी परिस्थितीत अल्प पाण्यावर हे छोटेशे रोपटे जगतील व भविष्यात पर्यावरण समतोलाबरोबरच रुगणालयात आलेल्या दु:खी रुग्णांना सावली देण्याचे काम तरी ते वृक्ष देतील अशी कर्मचाऱ्यांची धारणा आहे. या कृतीतून या कर्मचाऱ्यांनी आदर्श सर्वा पुढे ठेवला आहे. (वार्ताहर)