शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील सर्व गणेशमूर्तींची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:24 IST

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीबांधवांनी बनविलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक १५० गणेशमूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी भावात व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणरायाच्या मूर्तींना भाविकांनी प्राधान्य दिले आहे.

नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदीबांधवांनी बनविलेल्या शाडूमातीच्या पर्यावरणपूरक १५० गणेशमूर्ती हातोहात विकल्या गेल्या आहेत. बाजारभावापेक्षा कमी भावात व पर्यावरणपूरक शाडूमातीच्या गणरायाच्या मूर्तींना भाविकांनी प्राधान्य दिले आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला बंदी सागर भरत पवार हा पेण येथील असून, तो चांगला मूर्तिकार आहे. बंदी सागर याने कारागृह प्रशासनाकडे श्री गणरायाच्या मूर्ती बनविण्यासाठी परवानगी देण्याची गेल्या चार वर्षांपूर्वीच मागणी केली होती. मात्र सागर याच्या मागणीकडे कारागृह प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. सध्याचे कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी सागर पवार याची मागणी लक्षात घेऊन वरिष्ठांकडून परवानगी मिळवत मूर्ती बनविण्यासाठी कच्चा माल उपलब्ध करून दिला होता. दीड-दोन महिन्यांपूर्वी बंदी सागर याला श्री गणपतीच्या मूर्ती बनविण्याची परवानगी व कच्चा माल मिळाल्यानंतर त्याने सहकारी बंदी चंद्रकांत सागवेकर, सखाराम बोले, विलास दिवे, अशोक भरत, गणेश सोनवणे यांना मार्गदर्शन करून विविध आकारांच्या, प्रकारच्या ‘श्रीं’च्या मूर्तींचे साचे बनविले. एक-दीड महिन्याच्या कालावधीत सागर व त्यांच्या सहकाºयांनी शाडूमातीच्या पर्यावरणपूरक वेगवेगळ्या आकाराच्या सुमारे १५० रेखीव श्री गणरायाच्या मूर्ती बनविल्या. आकर्षक रंगरंगोटी व रेखीव मूर्तींना रंगीबेरंगी खड्यांचे हार, कानातले आदी प्रकारे सजावट करण्यात आली आहे. पहिल्यांदाच कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या मूर्ती प्रवेशद्वाराजवळील प्रगती भांडारमध्ये चार दिवसांपूर्वी विक्रीस ठेवल्या होत्या. पर्यावरणपूरक शाडूमातीच्या, रेखीव व बाजारभावापेक्षा कमी दरात असलेल्या मूर्ती भाविकांनी हातोहात खरेदी करून लागलीच घरी घेऊन गेले. ‘श्रीं’च्या आगमनाला अद्याप ४ दिवसांचा अवधी शिल्लक असताना कारागृहात बंदीबांधवांनी बनविलेल्या मूर्ती हातोहात विक्री झाल्या आहेत. काही मूर्ती कारागृहाचे कर्मचाºयांनी देखील विकत घेतल्या आहेत.कारागृहात बनविलेल्या विविध आकारांच्या श्री गणरायाच्या मूर्तीसोबत त्या आकाराचा सागवानी लाकडी पाटसुद्धा देत आहोत. पहिल्या टप्प्यातील मूर्प्ती संपल्या असून, राहिलेल्या मूर्ती लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पुढील वेळेला लवकर नियोजन केले जाईल.- पल्लवी कदम, कारागृह कारखाना प्रमुख