शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

साकारतोय समग्र सावरकर वाङ्मय कोश

By admin | Updated: February 23, 2016 00:11 IST

प्रकल्पाला वेग : संदर्भासाठी उपयुक्त साहित्यकृती; दोन वर्षांत होणार उपलब्ध

 नाशिक : देशवासीयांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण वाङ्मयाचा समावेश असलेला ‘समग्र सावरकर वाङ्मय कोश’ साकारत असून, अंदाजे तीन ते पाच हजार पृष्ठांचा हा कोश पुढील दोन वर्षांत सावरकरप्रेमींसाठी उपलब्ध होणार आहे. आगामी सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने, निमंत्रक भाऊ सुरडकर व कोशाचे संपादक डॉ. नागेश कांबळे यांनी याविषयी माहिती दिली. ग्रंथालय व माहितीशास्त्राचे अभ्यासक डॉ. कांबळे यांना गेल्या वर्षी या कोशाची कल्पना सुचली. त्यांनी बदलापूर येथील स्वायत्त मराठी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर यासंदर्भात प्रस्ताव ठेवताच त्याला मंजुरी मिळाली. तेव्हापासून या कोशाचे काम सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित समग्र ग्रंथ, सावरकर साहित्यविषयक इतर लेखकांचे ग्रंथ, विविध नियतकालिकांनी प्रकाशित केलेल्या प्रासंगिक विशेषांकांचा, त्यातील लेखांचा तपशील, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनांप्रसंगी प्रकाशित झालेल्या विविध संस्थांच्या स्मरणिकांचा व त्यातील लेखांचा तपशील, सावरकरांच्या विविध पैलूंशी निगडित नियतकालिकांतील तसेच वृत्तपत्रांतील लेखांचा तपशील, सावरकरांच्या जीवनाशी, साहित्याशी निगडित ध्वनिफिती, चित्रफिती (सीडी/डीव्हीडी) अन्य पैलू अशा सहा भागांचा या कोशात समावेश राहणार आहे. या सर्व विभागांतील साहित्य संकलनाचे काम सुरू असून, आतापर्यंत जवळपास एक हजार पृष्ठे हस्तलिखित मजकूर तयार झाला आहे. कोशातील सर्व साहित्य मूळ मजकुराबरहुकूम, कोणतेही संपादकीय संस्कार न करता पुनर्मुद्रित केले जाणार आहे. सावरकर साहित्यावर संशोधन करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा कोश महत्त्वपूर्ण संदर्भसाधन उपलब्ध करून देणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)