शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्य, अध्यात्माचा अभ्यासक हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:39 IST

आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.

नाशिक : आपल्या प्रवचनांमधून नेहमीच अध्यात्मा विषयीची दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारे, अध्यात्माचे गाढे अभ्यासक व संत साहित्यावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती समाजाने यशवंत पाठक यांच्या रूपाने गमाविल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.सावानाच्या वा. गो. कुलकर्णी कलादालनात बुधवारी (दि.२७) यशवंत पाठक यांची श्रद्धांजली सभा झाली. यावेळी त्यांचे बंधू कवी किशोर पाठक, सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते उपस्थित होते. अध्यात्म आणि संतसाहित्य हे पाठक यांचे जीव की प्राण होते. संत साहित्याला दिशा देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. तसेच लोकांना अध्यात्माचे महत्त्व समजावे, यासाठी विविध व्याख्यानांमधून मार्गदर्शन केले, अशा भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त झाल्या.माझ्या आत्मचरित्रात त्यांच्या अनेक आठवणी मांडल्या आहेत. त्यांचे बोलणे रसाळ-मधुर होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे संतसाहित्य पोरके झाले आहे, असे डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी यावेळी सांगितले. अध्यात्माची बाजू त्यांनी अत्यंत दमदारपणे मांडल्याचे पुरुषोत्तम सावंत यांनी सांगितले. पाठक यांच्यासोबत खूप काम केले. आम्ही एमएपर्यंत एकत्र शिक्षण घेतले. अनेक विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या. त्यांच्याशी संवाद म्हणजे एक मेजवानीच असायची. त्यांच्या जाण्याने संत साहित्याची हानी झाल्याची भावना श्रीकृष्ण सिन्नरकर यांनी व्यक्त केली. शलाका सावंत, प्राचार्य वेदश्री थिगळे, रमेश कडलग, सुभाष सबनीस, माधवराव भणगे, विठ्ठल देशपांडे, चंद्रकांत खासे, अ‍ॅड. भानुदास शौचे, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. उल्हास रत्नपारखी यांनीही श्रद्धांजली वाहिली. प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिक