नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या साकूर व नांदूरवैद्य येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्साहात साजरी करण्यात आली. साकूर ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम सहाणे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. नांदूरवैद्य येथे भजनी मंडळाच्या वतीने व महिला भजनी मंडळाच्या वतीने संगीत भजनीमालेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महिलांनी संत तुकाराम महाराज यांचे अभंग गात भाविकांना मंत्रमुग्ध केले. भक्ती आणि शक्ती म्हणजे संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवंत देखावे सादर करण्यात आले. संत तुकाराम महाराज यांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी साकूर ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम सहाणे, दिलीप सहाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
साकूर येथे संत तुकाराम महाराज बीज उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:59 IST