शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखी शिवशाहीतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 23:56 IST

आषाढ शुद्ध दशमी अर्थात मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची मानाची पालखी पंढरपूरकडे शिवशाही बसमधून प्रस्थान करीत आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : कोविडची टेस्ट करूनच मानकरी निघणार

त्र्यंबकेश्वर : आषाढ शुद्ध दशमी अर्थात मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांची मानाची पालखी पंढरपूरकडे शिवशाही बसमधून प्रस्थान करीत आहे.या बसमध्ये सुमारे २० लोकांना जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. यात दोन पोलीस, दोन वैद्यकीय अधिकारी, एक मानकरी, दोन पुजारी, टाळकरी, एक विणेकरी, नऊ किंवा दहा विश्वस्त आदींचा सहभाग असेल. तर ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, रामभाऊ मुळाणे यांना वयाचे कारण दाखवून बसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. तथापि या तीनही ज्येष्ठ विश्वस्तांचे मत आहे की, आमच्याऐवजी आमच्या मुलांना परवानगी द्या, पण यादी होऊन गेल्यामुळे नवीन प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही असे समजते.पायी दिंडी सोहळ्याप्रसंगी गावात वारकरी मोठ्या संख्येने येत असतात. दोन-तीन दिवस त्र्यंबकेश्वर परिसर मंदिर परिसर गजबजून जात असते. त्यानंतर पालखीला निरोप देताना संपूर्ण गाव एकवटतो. जणू त्र्यंबक मध्येच यात्रा भरली आहे असा भास झाल्याशिवाय राहात नाही, तर पंढरपूर यात्रा संपन्न झाल्यानंतर पाच दिवस पंढरपूरला पालखीचा मुक्काम होत असतो. विश्रांती घेऊन सोळा दिवसांचा परतीचा पायी प्रवास करून श्रावण महिन्यात नागपंचमीच्या आदल्या दिवशी भरपावसात थंडीने कुडकुडत पालखीचे आगमन होत असे. त्यावेळेसही मंदिरात जणू दिवाळी अवतरली आहे. कारण देव तब्बल चाळीस दिवसानंतर स्वगृही परतले!

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम