शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

सिन्नरला घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 14:38 IST

सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करुन मध्यप्रदेशात जावून मुद्देमाल विकणा-या परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

सिन्नर : शहर, उपनगरे व औद्योगिक क्षेत्रात घरफोड्या करुन मध्यप्रदेशात जावून मुद्देमाल विकणाºया परराज्यातील दोघा सराईत चोरट्यांना नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तीन दिवस मध्यप्रदेशात तळ ठोकून पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशात पथक पाठविले होते. धार जिल्ह्यातील कुक्षी तालुक्यात सिंगाचोरी गावात सदर गुन्हेगार वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतरपथकाने सापळा रचला. यातील संशयीत ठाकूर ऊर्फ कालू हारु मंण्डलोई (२३) व करमसिंग कालू भुरीया (३२) यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांच्या अन्य साथीदारांची नावे सांगण्यासह सिन्नर शहर, शिवाजीनगर, सरदवाडीरोड, पांडवनगरी, गाडे मळा व उद्योगभवन या सहा ठिकाणी बंद घरांवर पाळत ठेवून चोºया केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीश आडसुळ, हवालदार दिलीप घुले, प्रकाश चव्हाणके, रवींद्र वानखेडे, प्रितम लोखंडे, नीलेश कातकाडे, किरण काकड, हेमंत गिलबिले, संदीप लगड, प्रदीप बहीरम यांनी कामगिरी केली. अटक करण्यात आलेले आरोपी साथीदारांसह पाळत ठेवून कडीकोयंडा तोडून घरफोड्या करीत. घरफोड्या केल्यानंतर शिर्डी गाठून एम. पी. पासिंगच्या वाहनांना हात देवून ते धार जिल्ह्यात पळून जात होते. गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल मध्यप्रदेश राज्यातील आलीया राजपूर जिल्ह्यातील बोरी येथील व्यापाºयास विक्री करीत होते. त्यानंतर आलेले पैसे वाटून घेत होते.

टॅग्स :Nashikनाशिक