अंदरसूल : येथील जहागीरदार परिवार मित्रमंडळाच्या वतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क व पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या, फळे वाटप करण्यात आले. याबरोबरच गावातील गरजू गरीब नागरिकांना मास्क व किराणा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, अंदरसूल बिटाचे तांदळकर, पगार, तेजराज जहागीरदार, यशराज जहागीरदार, योगीराज जहागीरदार, परमवीर जहागीरदार, आनंद जहागीरदार, नंदकुमार हाडोळे, ओंकार घोरपडे, स्वरूप देशमुख, शिवम धुमाळ, अभिनंदन जैन, सोनू चकणकर आदी उपस्थित होते.
जहागीरदार मित्रमंडळातर्फेमास्क, सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:11 IST