शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा युक्रेनवर भयंकर हल्ला! ४० क्षेपणास्त्रे, ४०० ड्रोन हल्ल्यात चार ठार, २० जण जखमी
2
आजचे राशीभविष्य : शनिवार 07 जून 2025; आजचा दिवस शुभ फलदायी, गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल
3
पाकिस्तानसाठी ६ मे ची रात्र ठरली ‘कयामत की रात’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
4
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ४५ किलो शुद्ध सोन्याचा वापर; किंमत सुमारे ५० कोटी
5
मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या संघटनांच्या आठ दहशतवाद्यांना अटक; शस्त्रे, दारूगोळा जप्त
6
विशेष लेख: महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी निवडणूक विषसमान
7
बँकांना २.५ लाख कोटींची संजीवनी; कर्जांची सोय; अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी निर्णय
8
मिठी सफाई घोटाळाप्रकरणी १५ ठिकाणी छापे; अभिनेता डिनो मोरियाच्या घरावरही धाड
9
एलॉन मस्क यांचे वडीलही भारताच्या प्रेमात! अयोध्येतील राम मंदिरात येत रामललाचे घेतले दर्शन
10
RBIचे गिफ्ट, स्वस्तात काढा कर्ज! रेपोदरात अर्धा टक्का जम्बो कपात, कमी होणार EMI
11
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
12
अग्रलेख: अर्थव्यवस्थेत सुखद झुळूक! निर्णय अकस्मात; पण त्यामागे स्पष्ट आर्थिक कारणे
13
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
14
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
15
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
16
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
17
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
18
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
19
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
20
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन

साई ब्रह्मनाद मंचाचा मलेशियात स्वरनाद

By admin | Updated: August 23, 2015 22:48 IST

साई ब्रह्मनाद मंचाचा मलेशियात स्वरनाद

येवला : येथील साई ब्रह्मनाद स्वरमंचास मलेशियात साईभक्तीपर गीते सादर करण्याची संधी लाभली आहे. मलेशियातील साईभक्तांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मलेशियात एकूण २६ साईबाबा केंद्रे आहेत. या मंदिरात येवल्यातील साईभक्त भजनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. मलेशियामधील साईबाबा सोसायटी आॅफ मलेशियाचे चेअरमन एस.पी. कन्नन यांनी या मंचाला निमंत्रित केल्याने हे कलावंत मलेशियाला रवाना झाले आहेत. येत्या ३ सप्टेंबरपर्यंत मलेशियात त्याचे सलग १५ दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये साईभजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्रुतिकंकण संगीत विद्यालयाचे संस्थापक प्राचार्य रवींद्र पिंगळे यांनी दिली.एस.पी. कन्नन हे २५ वर्षांपासून मलेशियामधील अनेक साईभक्तांना दरवर्षी शिर्डी येथे साईदर्शनासाठी घेऊन येत असतात. अनेक साईभक्त या सुविधेचा लाभ घेत आहेत. साई ब्रह्मनाद स्वरमंचाचे कलाकार संकेत दरकदार, नीलिमा खानापुरे (गायक), नकुल मोहन भगत (तबला), पंकज पाखले, पराग पाखल (सिंथेसायझर), (गायक) हे सर्व कलाकार प्रा. रवींद्र पिंगळे यांच्याकडे १४ वर्षांपासून संगीत शिक्षण घेत आहेत. सर्व कलाकार हे संगीत विशारद तसेच एम.ए.संगीत या परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे आयोजित कार्यक्रमात ३० आॅगस्ट रोजी यू.के.तील साईबाबा आॅर्गनायझेशन यांच्यातर्फे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय अखंड भजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारताचे प्रतिनिधित्व शिर्डीचे साई ब्रह्मनाद स्वरमंचास सलग दुसऱ्या वर्षी सलग ४ तास भजनसेवेची संधी मिळाली असल्याची माहिती रवींद्र पिंगळे यांनी दिली. तसेच अखंड भजन कार्यक्रमात मलेशिया, भारत, जर्मनी, सिंगापूर, यू.के. व आॅस्ट्रिया हे देश सहभागी होणार असून साई स्वरनाद मंच व इतर देशाची भजन जुगलबंदी हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्र माचा सर्व आर्थिक भार मलेशियातील साईभक्तांनी केला आहे. (वार्ताहर)