शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘साहेब.. दहावे झाल्यावर तारीख देणार का?

By admin | Updated: August 8, 2014 01:40 IST

‘साहेब.. दहावे झाल्यावर तारीख देणार का?

’रेडगाव खुर्द : राजस्व अभियानांतर्गत काजीसांगवी येथील महसूल अदालतीत प्रलंबित शेतरस्त्याचा प्रश्न मांडल्यानंतर तहसीलदारांनी नेहमीच्या सरकारी खाक्याप्रमाणे पाहायला येऊ, असे शासकीय उत्तर दिले. शेतकऱ्याने कधी येणार? असा प्रती प्रश्न करताच तहसीलदारांनी तारीख मिळाल्यानंतर बघू, असे सांगताच हेलपाटे मारून थकलेल्या वृद्ध शेतकऱ्याच्या तोंडून ‘साहेब..दहावे झाल्यावर तारीख देणार का’? असा गलितगात्र सवाल केल्याने लालफितीचा कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. महसूलच्या विविध योजनांची माहिती व समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, पुरवठा अधिकारी डोळसे, आमदार शिरीष कोतवाल यांच्या उपस्थितीत महसूल अदालत आयोजित केली होती. पुणेगाव कालवा गेल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. याबाबत सहा-सात वर्षांपासून तहसीलदारांकडे अर्ज फाटे केले. मागील अदालतीतही प्रश्न मांडला; परंतु अद्याप दखल घेतली नाही. हाच प्रश्न आजच्या अदालतीत सदर शेतकरी देवराम पर्बत ठाकरे यांनी मांडला असता तहसीलदार मनोज देशमुख यांनी शासकीय उत्तर देताच अर्ज फाटे अन् हेलपाटे मारून हतबल झालेल्या शेतकऱ्याच्या तोंडून साहेब..(माझे) दहावे झाल्यावर तारीख देणार का? असा सवाल झाला. वृद्धाचा गलितगात्र सवाल महसूल विभागाच्या कामकाजाचे अनुमान करण्यास पुरेसा आहे.प्रारंभी संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, परित्यक्ता महिलाच्या योजना, कुटुंब अर्थ सहाय्य योजना, आम आदमी बिमा योजनाच्या पात्रतेच्या अट, देण्यात येणारे लाभ व शेतकरी हिताच्या शासन निर्णयांची माहिती देण्यात आली. पुणेगाव कालव्यात गेलेल्या जमिनीचा अद्याप मोबदला मिळाला नाही. याबाबत आलेल्या निवेदनावर कोतवालानी खुलासा केला. जीर्ण शिधापत्रिका बदलून मिळाव्या, पाच वर्ष उलटूनही लाभ मिळत नाही अशा सर्वाधिक तक्रारी पुरवठा विभागाच्या आल्या. गारपीटग्रस्त अनुदानातील गोंधळ अशाही तक्रारी आल्या. त्या निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी १५ शिधापत्रिका देण्यात आल्या. परंतु नवीन, दुय्यम, विभक्त शिधापत्रिकांचे अर्ज वाटप व स्वीकृती केल्याने एकच गोंधळ उडाला. बाळकृष्ण ठाकरे, सरपंच रंजना पगारे, उपसरपंच सुनील ठाकरे, एन. पी. शिंदे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)