राजापूर : येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहविचार सभा झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे स्थानिक संचालक तुळशीराम विंचू तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय सानप, पोपट आव्हाड, प्रमोद बोडखे, प्राचार्य पी. के. आव्हाड, लक्ष्मण घुगे, अनिल अलगट उपस्थित होते. सध्या कोरोना संकटामुळे शाळा बंद, पण शिक्षण सुरू आहे.आॅनलाइन शिक्षण व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या विषयावर प्राचार्य पी. के. आव्हाड, लक्ष्मण घुगे, प्रमोद बोडखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयास तपमान मापक मशीन शिवकृपा इण्डेन गॅस वितरक समाधान चंद्रभान चव्हाण यांनी भेट दिले.तसेच राजापूर ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सभापती पोपट आव्हाड, माजी सरपंच प्रमोद बोडखे यांच्या हस्ते आॅक्सिमीटर शाळेला भेट देण्यात आले. विविध विषयांवर या सभेत चर्चा झाली. सभेस अर्जुन विंचू, प्रवीण वाघ, धनराज अलगट उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर. बी. वाघ यांनी केले.
राजापूर विद्यालयात सहविचार सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:34 IST
राजापूर : येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहविचार सभा झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे स्थानिक संचालक तुळशीराम विंचू तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय सानप, पोपट आव्हाड, प्रमोद बोडखे, प्राचार्य पी. के. आव्हाड, लक्ष्मण घुगे, अनिल अलगट उपस्थित होते. सध्या कोरोना संकटामुळे शाळा बंद, पण शिक्षण सुरू आहे.
राजापूर विद्यालयात सहविचार सभा
ठळक मुद्देविविध विषयांवर या सभेत चर्चा झाली.