शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राम पाहणी : गेल्या वेळपेक्षा चांगली कामे झाल्याबद्दल दिले प्रशस्तिपत्र

By admin | Updated: June 5, 2015 00:39 IST

सिंहस्थ कामांविषयी अखेर ग्यानदास ‘संतुष्ट’

नाशिक : ‘ते’ येणार म्हटल्यावर जिल्हाधिकाऱ्यांपासून महापालिका आयुक्तांपर्यंत झाडून सगळ्यांच्या चिंतेत भर पडणार... ‘यह ऐसा क्यों नहीं’, ‘वह वैसा क्यों’ म्हणत ते प्रश्नांची सरबत्ती करणार... सगळा अधिकारीवर्ग ‘जी महाराज, हो जाएगा’ म्हणत माना हलवणार... असे आजवरचे चित्र असताना, आज मात्र त्यात बदल घडला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांविषयी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी चक्क समाधान व्यक्त केले. ‘गये कुंभ की तुलना से इस बार बहुत अच्छा काम हुआ हैं, इससे हम बहुत संतुष्ट हैं..’ अशा शब्दांत त्यांनी सिंहस्थ कामांविषयी प्रशस्तिपत्र दिले अन् अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरले.महंत ग्यानदास यांनी आज सायंकाळी तपोवनातील साधुग्रामची पाहणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ग्यानदास यांनी साधुग्रामची पाहणी केली व त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना कामांविषयी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्या कुंभमेळ्यात साधुग्रामसाठी १०८ एकरच जागा देण्यात आली होती. यंदा मात्र ती ३३५ एकर एवढी आहे. गेल्या वेळी साधूंचे तीनशे खालसे होते, ते आता सातशे झाले आहेत; मात्र प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अन्य ठिकाणच्या कुंभमेळ्यांच्या तुलनेत नाशिक येथे उत्तम सोय झाली असून, याबाबत आपण समाधानी आहोत. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त होणाऱ्या स्वच्छता मोहिमेत आपल्यासह साधू-महंत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी ग्यानदास यांनी साधूंसाठीच्या प्रसाधनगृहांची पाहणी करीत तेथे साध्या शौचालयांसह कमोडचीही व्यवस्था करण्याची सूचना केली. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी साधुग्रामचा नकाशा दाखवत ग्यानदास यांना माहिती दिली. तसेच ‘साधुग्राम’ या मोबाइल अ‍ॅपविषयी त्यांना अवगत केले. या अ‍ॅपवर ‘प्लॉट’चा क्रमांक टाकताच तातडीने मार्ग दाखवला जातो. कोणाला विचारण्याची गरज उरत नाही, असे त्यांनी महंतांना सांगितले. साधुग्रामची वाहनातून पाहणी केल्यानंतर प्रशासकीय कार्यालयात अनौपचारिक बैठक झाली. त्यावेळी उपस्थित साधू-महंतांमध्ये चर्चा झाली.यावेळी दिगंबर अनी आखाड्याचे महंत रामकिशोरशास्त्री, महंत भक्तिचरणदास, महंत रामसनेहीदास, महंत विश्वंभरदास, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, महापालिका शहर अभियंता सुनील खुने, पोलीस निरीक्षक अनिल पवार, मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, धनंजय बेळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)