शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

‘संदल-ए-खास’निमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:58 IST

‘सादिक तेरे रोजे पर क्या क्या नजर आता हैं...,’ ‘था नासिक में बातील अंधेरो को डेरा, वो तैबा से आयें लेकर सवेरा...’, ‘ये खुशनसिबी हैं तेरी शहरे नासिक, तुझे शाह सादिक की अजमत मिली हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस स्तुतीकाव्यांचे (मनकबत) पठण करीत शेकडो समाज बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला. बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता.

नाशिक : ‘सादिक तेरे रोजे पर क्या क्या नजर आता हैं...,’ ‘था नासिक में बातील अंधेरो को डेरा, वो तैबा से आयें लेकर सवेरा...’, ‘ये खुशनसिबी हैं तेरी शहरे नासिक, तुझे शाह सादिक की अजमत मिली हैं...’ अशा एकापेक्षा एक सरस स्तुतीकाव्यांचे (मनकबत) पठण करीत शेकडो समाज बांधवांनी ‘जुलूस-ए-हुसेनी’मध्ये सहभाग घेतला. बडी दर्गावर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता.निमित्त होते, जुने नाशिकमधील हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनीबाबा यांचा ‘संदल-ए-खास’चे. गुरुवारी (दि.७) संध्याकाळी जुने नाशिकमधून ‘जुलूस-ए-हुसेनी’च्या मिरवणुकीचे चौकमंडई येथील बज्मे गरीब नवाज मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी मिरवणुकीच्या प्रारंभी फातिहा पठण करत संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या संरक्षण व शांततेसाठी प्रार्थना केली. खतीब यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी हुसेनी युवक मंडळाच्या वतीने बडी दर्गाच्या प्रांगणात महाप्रसादाचे (लंगर) वाटप करण्यात आले. त्यानंतर दर्गा येथे विशेष १६वी शबनिमित्त धार्मिक मैफल संपन्न झाली.