शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साडेबारा लाखांचे मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:28 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्यविक्री, वाहतुकीच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून, गेल्या चोवीस दिवसांत १४७ गुन्हे दाखल करून सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या चोवीस तासांत दोन ठिकाणी छापे मारून गावठी दारू व दादरा नगर हवेली येथून आणण्यात येणारे विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआचारसंहिता : पंचवटी, सीमावर्ती भागात मोठी कारवाईमद्याची वाहतूक करणारी वाहने जप्त

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्यविक्री, वाहतुकीच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून, गेल्या चोवीस दिवसांत १४७ गुन्हे दाखल करून सुमारे साडेबारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गेल्या चोवीस तासांत दोन ठिकाणी छापे मारून गावठी दारू व दादरा नगर हवेली येथून आणण्यात येणारे विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.राज्य उत्पादन शुल्क खात्याला मिळालेल्या माहितीनुसार पंचवटीतील वाघाडी येथे रिक्षामधून गावठी दारूची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाल्याने भरारी पथकाने सदरची रिक्षा ताब्यात घेऊन त्यातील ११५ लिटर गावठी दारू जप्त केली तसेच वाहतूक करणारा सरताज रमेश रोकडे, रा. समतानगर, आगरटाकळी यास अटक केली आहे. गुरुवारी रात्री दादरा नगर हवेली येथून कर चुकवेगिरी करून महाराष्टÑात प्रतिबंधित असलेले विदेशी मद्याची वाहतूक करणारी स्कार्पिओ क्रमांक (एम. एच. ०५ जी. २२३५) ही संशयावरून जिल्ह्णाच्या सीमेवरून ताब्यात घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा सापडला. किसन सुभाष चाफळकर, रा. आंबेडकरनगर, चुंचाळे यास ताब्यात घेण्यात आले असून, मद्याचा साठा व वाहन जप्त करण्यात आले आहे. जिल्ह्णात आचारसंहिता जारी झाल्यानंतर १४७ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात १२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाबासाहेब भुतकर, मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, हेमंत नेहरे, जवान विलास कुवर, सुनील पाटील, विरेंद्र वाग, विष्णू सानप आदींनी ही कारवाई पार पाडली. या कारवाईत १८,९१० लिटर रसायन, ९३६ लिटर गावठी दारू, ८७२ लिटर देशीदारू, ६२ लिटर विदेशी दारू, १५९ लिटर बिअर, २१५ लिटर ताडी व परराज्यांतून विक्रीसाठी आलेले १२२ लिटर विदेशी मद्याचा साठा जप्त केला असून, मद्याची वाहतूक करणाऱ्या चार दुचाकी, दोन तीनचाकी, दोन चारचाकी वाहने असा १२ लाख, ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात आहे.