नाशिक : रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्त्येप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ़ जालिंदर सुपेकर, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व वाळू ठेकेदार सागर चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर रविवारी (दि़ १८) पंचवटी पोलिसांनी सादरे कुटुंबीयांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्य तसेच शेजारील व्यक्तींचे जबाब नोंदवून घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली़माधुरी सादरे यांनी फिर्यादीत केलेल्या आरोपांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सादरे यांचा मुलगा ओमकार, मुलगी पूनम, भाऊ प्रवीण, दोन बहिणी तसेच कुटुंबातील नातेवाइकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले़ त्यामध्ये सादरे यांना कशाप्रकारे त्रास दिला जात होता, याची माहिती जबाबामध्ये लिहून घेण्यात आला़ याबरोबरच सादरे यांच्या शेजारी राहणारे नागरिकांचेही जबाब नोंदवून घेतल्याचे वृत्त आहे़निरीक्षक सादरे यांनी शुक्रवारी (दि़ १६) सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ त्यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली़ गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही या भूमिकेनंतर पोलिसांनी अधीक्षक सुपेकर, निरीक्षक रायते व ठेकेदार चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला़
सादरे आत्महत्त्या; कुटुंबीयांची चौकशी
By admin | Updated: October 18, 2015 22:52 IST