’हेमंत कुलकर्णी ल्ल नाशिकना माँगे ये सोना चाँदीमाँगे दर्शन देवीतेरे द्वार खडा एक जोगीहेमंतकुमार यांच्या दर्दभऱ्या आवाजातल्या या लोकप्रिय गाण्याचा खडबडीत अनुवाद करायचा झाला तर,नाही मागत डीसीएमना मागत मलईदार खातीफक्त दे दर्शन सत्तादेवीद्वारी उभा तुझ्या एक फकीर जोगीअसाच काहीसा होईल नाही?महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री आणि सेनाप्रमुखांचे परमस्नेही ‘जनाब’ अंतुले त्यांच्या भाषणांमधून बऱ्याचदा असे म्हणत, ‘तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे पलू लागलात की ती तुमच्यापासून दूर पलते आणि तुम्हीत तिच्यापासून पलू लागलात की ती तुमच्या मागे पलत येते’. असेलही हे खरे. पण असेल कशाला, आहेत आणि त्याचा प्रत्यय अन्य कोणाला येण्यापेक्षा थेट सेनाप्रमुखांच्या चिरंजीवांनाच यावा, हा किती अपूर्व योगायोग बरे!मुंबईच्या बोरीबंदर स्टेशनच्या बाहेर बऱ्याचदा एखाद्या उपयोगी वस्तुचा डोंगर लावून विक्रेता त्याची विक्री करीत असतो. एक खट गिऱ्हाईक येतं. विक्रेता सांगतो त्या किंमतीच्या एकदम दहा टक्के किंमतीचा देकार देतो. आधी विक्रेता तयार होत नाही. खूप घासाघीस होते. अखेर विक्रेता तयार होतो, ‘जाव लेके जाव, तुम भी क्या याद करोगे’ असे म्हणतो. पण गिऱ्हाईक तोंड फिरवून निघून जातं, काहीही न घेता. मग काय नुसतीच चडफड आणि चिडचिड. आता यात कोण सेना आणि कोण भाजपा, हे ज्याचं त्यानं ठरवावं!खरं तर बार्गेनींगलाही काही मर्यादा असतात. पण या मर्यादांचाही कडेलोट झाला. त्यासाठी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मार्क द्यावेत तितके थोडेच. ताठरपणा ते अति सैलपणा हा निकालोत्तर प्रवास मतदानपूर्व काळात झाला असता तर? असं भाजपावाले उर्फ चड्डीवाले, उर्फ शास्ताखानाची फौजवाले भले म्हणोत पण महाराष्ट्राचं आणि मराठी माणसांच भलं करण्याचं कांकण त्यांनी थोडंच हाती चढवलं आहे. आणि होऊ शकते कधी कधी ‘एरर आॅफ जजमेन्ट’ पण म्हणून का पंचवीस वर्षे सहन केलेला सूनवास असा एकाएकी का सासुरवासात तबदील करायचा? सासुरवास म्हटलं की सासूचं खाष्टपण ओघानंच आलं. परिणाम एकच, सुनेचं मीठ अळणी. किती वेगवेगळ्या पद्धतीनं आळवून बघितलं. ‘आता आम्ही नाही, तर तुम्ही मोठे बंधू’?. चालेल! तुम्ही सांगाचं आणि आम्ही ऐकाचं. तुम्ही द्याल ते निमूट स्वीकारु. पण काही बोलाल तर खरं. पण कुणी काही बोलायलाच तयार नाही. आता बोलतील, मग बोलतील या आशेवर आपणहूनच सत्तासोपानाची एकेक पायरी उतरायला सुरुवात केली. समोरचे जणू सुचवत होते, तोडायचं ना, मग आत्ताच तोडा, कालापव्यय नको! पण त्यांना सांगायला काय जातंय? परप्रांतीयांपासून मुंबईसह अखंड महाराष्ट्र वाचवायचाय, यवनांपासून देश वाचवायचाय, अखंड हिन्दुस्थान आधी निर्माण करुन नंतर तो काँग्रेसमुक्तही करायचाय. हे शिवधनुष्य उचलणं म्हणजे चिन्हातील धनुष्यबाण वा रंगमंचावरुन उंचावलेल्या हातात गदा वा तलवार उचलण्याइतकं का सोपं आहे? एकाच्या जोडीला दुसरा असलेला केव्हांही चांगला. ‘मोअर द मेरिअर’ पण कशा-कशाचा म्हणून काहीही परिणाम नाही. शेवटच्या दिवसापर्यंत कसलं, शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघितली. ज्याची कधी ओळखदेखील झाली नव्हती, त्या संयमाचा मन:पूत वापर केला. पण अखेर शेवटी काय झालं?हाय रे जालीमतेरे दरपे खाली हाथ आये थेखालीही हाथ लौट चलें
‘साँवरीया, काहे मोरा कटोरा खाली
By admin | Updated: November 12, 2014 23:33 IST