शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शाळांकडून आॅनलाइन शिक्षणाची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:09 IST

नाशिक : जुलैपासून आॅनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणातून सूट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक : जुलैपासून आॅनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणातून सूट देण्यात येणार असल्याचे स्पष्ट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, शहरातील विविध खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांना घाई झाली असून, शाळांनी आॅनलाइन वर्ग सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक शालेय साहित्यासह गणवेशही शाळेकडूनच खरेदी करण्याची सक्ती संबंधित शाळांकडून केली जात आहे.शहरातील इंग्रजी माध्यमांच्या काही खासगी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांनी आॅनलाइन वर्ग सुरू केले आहे. या वर्गांत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना गणवेश बंधनकारक करण्यात येत असून, पालकांना विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके व गणवेश संबंधित शाळांकडून घेण्यास सांगितले जात आहे. शाळा सुरू करण्याविषयी स्पष्ट सूचना नसताना शाळांकडून अशाप्रकारे गणवेश व पाठ्यपुस्तकांची सक्ती का करण्यात येत असल्याने पालकही संभ्रमात आहेत.दरम्यान, शिक्षण विभाग आॅनलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार करत असला तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणातून सूट देण्यासोबतच केवळ नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने शासकीय शाळा अजूनही शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. मात्र काही खासगी संस्थांकडून आॅनलाइन माध्यमातून पूर्व प्राथमिकच्या नर्सरीसह, जुनियर व सिनियर केजी वर्गांसह पहिली, दुसरीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात घाई सुरू झाली आहे.--------------------विविध शैक्षणिक वर्ग सुरूपूर्व प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान किंवा मदत मिळत नाही. त्यांचे आर्थिक समीकरण विद्यार्थ्यांच्या शुल्कावरच अवलंबून असते. जितके अधिक विद्यार्थी तेवढेच अधिक उत्पन्न असे समीकरण बनले आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दुरावू नये यासाठी आॅॅनलाइन शिक्षणप्रणालीतून शाळांकडून धडपड सुरू आहे. यातूनच विद्यार्थ्यांचा पट वाढविण्याची स्पर्धा निर्माण झाली असून, गतवर्षात पालकांसोबत संवाद साधण्यासाठी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपच्या माध्यमातून झूम, गुगल मीटसारख्या अ‍ॅपच्या लिंक शेअर करून विविध शाळांनी नवीन शैक्षणिक वर्षांचे वर्ग सुरू करण्याची घाई सुरू केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक