शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:34 IST

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.

ठळक मुद्देसिन्नर: २२ ग्रामसेवक सहायक निवडणूक अधिकारी

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहायक निवडणूक अधिकारी असलेल्या २२ ग्रामसेवकांच्या ४२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी दाखले लागत आहेत. त्यांचीही अडचण निर्माण झाली आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिन्नर तालुक्यात होत आहेत. ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना दाखले देणे, घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या पावत्या वितरित करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये थांबावे की, अर्ज स्वीकारण्यासाठीची जबाबदारी पार पाडावी, असा पेच संबंधित ग्रामसेवकांसमोर निर्माण झाला आहे.                          अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्याने आधीच पॅनलचे स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार व त्यांच्या पाठिराख्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. ग्रामसेवक संघटनेने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचा-यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. कारण निवडणूक कार्यक्रम २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

                     इच्छुक उमेदवारांना चार-पाच दिवसात दाखले देणे व त्यानंतर या गावांतील अन्य नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे, त्यांनाही आवश्यक दाखले देणे अशी कामेही होऊ शकतील. याबाबतीत तहसीलदार काय निर्णय घेतात, याकडे ग्रामसेवकांचे लक्ष लागलेले आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतींवर पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा या मागणीने जोर धरला आहे.शासनाने घ्यावी दखलनिवडणूक विभागाने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास नागरिकांची अडचण होणार नाही. इच्छुक उमेदवारांची गैरसोय होणार नाही आणि त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची धावपळ थांबेल, अशी आमची भूमिका असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित गावांमध्येही निवडणुका असल्या तरी अन्य नागरिकांनादेखील विविध कामांसाठी दाखले, उतारे लागत असतात. त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी आणि निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक